सांगली : पलूसमध्ये लॉजवर छापा दोघांना अटक : वेश्या अड्डा उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 10:46 IST2018-10-01T10:45:13+5:302018-10-01T10:46:27+5:30
पलूस येथील आदिती लॉजमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला वेश्या अड्डा स्थानिक गुन्हे अन्वषेण विभागाने शनिवारी छापा टाकून उद्ध्वस्त केला. या छाप्यात लॉज मालकासह दोघांना अटक केली आहे.

सांगली : पलूसमध्ये लॉजवर छापा दोघांना अटक : वेश्या अड्डा उद्ध्वस्त
सांगली : पलूस येथील आदिती लॉजमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला वेश्या अड्डा स्थानिक गुन्हे अन्वषेण विभागाने शनिवारी छापा टाकून उद्ध्वस्त केला. या छाप्यात लॉज मालकासह दोघांना अटक केली आहे. ‘स्टिंग आॅपरेशन’ करुन ही कारवाई करण्यात आली.
लॉजमालक संतोष लक्ष्मण आबदर (वय २५, रा. सांडगेवाडी) व एजंट पोपट शंकर आवटी (४५, सावंतपूर, ता. पलूस) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध पलूस पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आवटी हा वेश्या व्यवसायासाठी महिला पुरविण्याचे काम करीत होता. या बदल्यात तो कमिशन घेत होता. आबदर लॉजवर वेश्या अड्डा चालवित होता.
संबंधित महिलेकडून व्यवसाय करुन घेऊन तिच्या कमाईवर हे दोघेही उदरनिर्वाह करीत असल्याची माहिती मिळाली.
पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या पथकाने ‘स्टिंग आॅपरेशन’ केले. वेश्या अड्डा सुरु असल्याची माहिती मिळताच छापा टाकला. छाप्याची चाहूल लागताच आबदर व आवटे यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र तत्पूर्वीच त्यांना पकडले.