शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

सांगली लोकसभा विशाल पाटील काँग्रेसच्या चिन्हावर लढणार?, मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2024 11:50 IST

काँग्रेसच्या तिसऱ्या यादीची प्रतिक्षा..

सांगली : सांगलीलोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. जिल्हा काँग्रेसचे नेते आक्रमक झाले असून, त्यांनी विशाल पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्याची मागणी मुंबईतील प्रदेश समितीकडे शुक्रवारी केली. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही सांगली जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेला हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे सांगलीतून विशाल पाटील हे कॉंग्रेसच्या चिन्हावर मैत्रीपूर्ण लढत देण्याचा प्रस्ताव आहे.गेल्या १५ दिवसांपासून सांगली लोकसभेच्या जागेवरून शिवेसना व काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे. शिवसेनेचे उद्धव ठाकरे व संजय राऊत यांनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना काही दिवसांपुर्वी शिवसेनेत पक्षप्रवेश देऊन उमेदवारी उमेदवारीचे संकेत दिले होते. यावेळी काँग्रेसने नाराजी व्यक्त केली. मिरजेत गुरुवारी सभा घेऊन उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांची लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली.यामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस गट आक्रमक झाला आहे. काँग्रेसचे नेते व पलूस-कडेगावचे आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, जिल्हाध्यक्ष व आमदार विक्रमसिंह सावंत, शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील आदी नेत्यांनी प्रदेशच्या नेत्यांची भेट घेऊन काँग्रेसला उमेदवारी देण्याची मागणी केली.

कोणत्याही परिस्थितीत सांगली लोकसभेची जागा शिवसेनेला सोडणार नसल्याची ठोस भूमिका प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडे मांडली आहे. महाविकास आघाडीच्या दोन-तीन वेळा बैठका पार पडल्या. या बैठकीत सांगलीचा विषय चांगलाच गाजला. पण आघाडीतील सांगलीच्या जागावाटपावर तोडगा निघालेला नाही.

काँग्रेस सांगलीत लढणारच : विक्रमसिंह सावंत

महाविकास आघाडीचा जागावाटपाचा निर्णय अद्याप झालेला नाही. तरीदेखील सांगलीत येऊन शिवसेनेच्या नेत्यांनी उमेदवार जाहीर केली आहे. यामध्ये आम्हाला विश्वासात घेतले नाही. पण ही बाब काँग्रेस प्रदेश समितीच्या निदर्शनास आणून काँग्रेसचे उमेदवार म्हणून विशाल पाटील यांची घोषणा करावी, यासाठी आग्रह धरणार आहे. कोणत्याही परिस्थितीत सांगलीत काँग्रेस लढणार असल्याचे जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसच्या तिस-या यादीची प्रतिक्षा ..जिल्हातील नेते व पदाधिका-यांनी प्रदेश काँग्रेसकडे विशाल पाटील यांची उमेदवारी घोषित करावी, अशी मागणी केली आहे. शिवाय काँग्रेसच्या तिस-या यादीत विशाल पाटील यांचे नाव समाविष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या यादीची प्रतिक्षा करीत जिल्ह्यातील नेतेमंडळी मुंबईत तळ ठोकून आहेत.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणlok sabhaलोकसभाcongressकाँग्रेस