शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Lok Sabha Election 2024 : सांगलीत विशाल पाटील लोकसभा अपक्ष लढवणार? काँग्रेस कार्यकर्त्यांचे पोस्ट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 17:04 IST

Sangli Lok Sabha Election 2024 : आज महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेतली. यात सांगलीची जागा ठाकरे गटाकडे कायम असेल असं जाहीर केलं.

महााविकास आघाडीत सांगली लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटला आहे. हा मतदारसंघ ठाकरे गटाला सोडण्यात आला आहे. दरम्यान, आता काँग्रेसचेविशाल पाटील बंडखोरी करणार की पैलवान चंद्रहार पाटील यांचा प्रचार करणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. महाविकास आघाडीतील या निर्णयानंतर सांगली काँग्रेसमधील कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. विशाल पाटील यांच्याबाबत सोशल मीडियावर जोरदार स्टेट्स व्हायरल झाले आहेत. 

आज महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेतली. यात सांगलीची जागा ठाकरे गटाकडे कायम असेल असं जाहीर केलं. यानंतर सोशल मीडियावर सांगली लोकसभेबाबत पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. या पोस्टमध्ये "आमचं काय चुकलं? आता लढायचं जनतेच्या कोर्टात "असं म्हटले आहे.

सांगलीत विशाल पाटील यांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाकडून पैलवान चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर विशाल पाटील नाराज होते. आता महाविकास आघाडीनेही ही जागा ठाकरे गटाला कायम ठेवल्यानंतर आणखी नाराजी वाढली आहे. उद्या सांगलीतील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत जो निर्णय घेण्यात येईल तो निर्णय कायम ठेवण्यात येणार आहे. 

याबाबत सांगली काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांनी प्रतिक्रिया दिली. सावंत म्हणाले, हा झालेला निर्णय दुर्देवी आहे. आमच्या मेरीट प्रमाणे आम्ही ही जागा मागत होतो. या बैठकीत आम्ही कार्यकर्त्यांचे मत घेणार आहोत यानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करणार आहे, असंही सावंत म्हणाले. विशाल पाटील अपक्ष लढवणार की नाही याबाबत आम्ही दोन दिवसात ठरवणार आहे, असंही सावंत म्हणाले. जिल्ह्यातील ही लोकसभेची निवडणूक आहे त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते आणि नेते यांचे मत जाणून घेणार  आणि यानंतर योग्य तो निर्णय घेणार आहे, असंही सावंत म्हणाले. 

आज सकाळी महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाल्यानंतर सांगली काँग्रेसच्या कार्यालयासमोर शुकशुकाट आहे. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची गर्दी झाली आहे. विशाल पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करत अपक्ष निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.   

टॅग्स :vishal patilविशाल पाटीलcongressकाँग्रेसBJPभाजपाShiv Senaशिवसेनाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४