शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'कारखाना चालवायला येत नाही, निघाले खासदार व्हायला'; अजितदादांनी विशाल पाटलांना डिवचलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 18:23 IST

Sangli Lok Sabha 2024 : महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरुन तिढा वाढला आहे, तर महायुतीचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Sangli Lok Sabha 2024 : महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरुन तिढा वाढला आहे, तर महायुतीचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. संजयकाका पाटील यांनी आज सांगलीत शक्तिप्रदर्शन करत जाहीर सभा घेतली. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी सभेत बोलताना अजित पवार यांनी काँग्रेस नेते विशाल पाटील यांच्यावर जोरदार टीका केली.  

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशाल पाटील यांना वसंतदादा पाटील सहकारी कारखान्यावरुन डिवचले. तर महायुतीच्या कार्यकर्त्यांनाही लोकसभा निवडणुकीबाबत सूचना दिल्या. 

'काल अर्ज भरला त्यांना मी लहान असल्यापासून बघतोय...', सजंयकाकांचे विशाल पाटलांवर टीकास्त्र

"मागच्या काळामध्ये ज्यांनी साखर कारखाने चांगले काढले, वसंतदादांनीही साखर कारखाना चांगला काढला. त्या कारखान्याचं वाटोळ कुणी केलं, आज तुम्ही दुसऱ्याला चालवायला कारखाने देता. साखर कारखाना चालवायची तुमच्यामध्ये धमक नाही.आम्ही साखर कारखाने चांगले चालवून दाखवतो, बँकांचं काय केलं? आज काय परिस्थिती आहे, अशी टीका अजित पवार यांनी विशाल पाटील यांच्यावर केली.

"इथं एवढी आर्थिक सुबत्ता होती आम्ही  सगळे सांगलीच उदाहरण देत होतो, सगळ्यात मोठा आमच्या महाराष्ट्रातील शेतकरी सहकारी साखर कारखाना नंतर तो वसंतदादा सहकारी साखर कारखाना म्हणून ओळखला गेला. पण, आता कोणतही दारु म्हणून तो कारखाना चालवतो आणि आम्ही त्यांच्या तोंडाकडे बघतो. ही तुमची परिस्थिती आहे, तुम्हाला कारखाना चालवता येत नाही आणि खासदार व्हायला निघालाय याचा कुठेतरी विचार करा, असा टोलाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेस नेते विशाल पाटील यांना लगावला.  

संजयकाका पाटील यांची विशाल पाटलांवर टीका

सांगली लोकसभा मतदारसंघात आज महायुतीकडून भाजपाचे खासदार संजयकाका पाटील यांनी अर्ज दाखल केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते, जाहीर सभेत बोलताना खासदार संजय पाटील यांनी काँग्रेसच्याविशाल पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. 

"सांगलीत दोन दिवसापूर्वी एक अपक्ष अर्ज भरला, त्यांना मी लहान असल्यापासून बघतोय. राजकारणातील परिपक्व नसलेलं नेतृत्व काय तर त्या मुलाकडे आपण सगळी बघतोय, असा टोला खासदार संजयकाका पाटील यांनी काँग्रेस नेते विशाल पाटील यांना लगावला.' त्यांनी मोठं मोठ्या वल्गना केल्या, घोषणा केल्या. त्यांनी १०, २० मुलांना ओरडायला लावलं, असा आरोपही संजयकाका पाटील यांनी केला.

टॅग्स :sangli-pcसांगलीAjit Pawarअजित पवारvishal patilविशाल पाटीलlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४BJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस