शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

अलमट्टीमुळेच सांगली, कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा धोका, महापूर नियंत्रण समितीचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 15:31 IST

मुख्य अभियंता हेमंत धुमाळ यांचे विधान अत्यंत चुकीचे आहे. या विधानाचा महापूर नियंत्रण समितीच्या बैठकीत निषेध करण्यात आला.

सांगली : कर्नाटकातील अलमट्टी, हिप्परगी धरणामुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांना महापुराचा धोका नाही, हे मुख्य अभियंता हेमंत धुमाळ यांचे विधान अत्यंत चुकीचे आहे. या विधानाचा महापूर नियंत्रण समितीच्या बैठकीत निषेध करण्यात आला. या भागाला अलमट्टी, हिप्परगी धरणामुळेच महापुराचा धोका आहे, असा दावाही महापूर नियंत्रण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची सांगलीत सोमवारी बैठक झाली. या बैठकीस महापूर नियंत्रण समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील, सेवानिवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण, आंदोलन अंकुशचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे, दीपक पाटील, संजय कोरे, सतीश रांजणे, चंद्रकांत पाटील, सचिन सागरे, सुनील जाधव आदी उपस्थित होते.बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सर्जेराव पाटील, दिवाण म्हणाले की, डॉ. हेमंत धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली २००६ मध्ये आयआयटी मुंबईचे दोन प्राध्यापक आचरे आणि साठे यांच्यासोबत समिती गठित केली होती. या तिघांच्या समितीचा अहवाल प्रशासनास सादर केला आहे. या अहवालात अलमट्टी धरणातील पाणीसाठ्याच्या फुगवट्यामुळेच सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील कृष्णा नदीकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाल्याचा दावा केला आहे; परंतु तो अहवाल गायब आहे. तो पाठपुरावा करूनही मिळत नाही.

२००६ मध्ये इंजिनिअर्स व आर्किटेक्टच्या सभागृहातील कार्यक्रमात अलमट्टीचा फुगवटाही महापुरास कारणीभूत आहे, असे डॉ. धुमाळ म्हणाले होते. मग आता असे बोलून ते भ्रम निर्माण का करत आहेत? मुळात धुमाळ यांनी वस्तुस्थितीचा अभ्यास करून बोलण्याची गरज होती. त्यांच्या या वक्तव्यामुळे पूरग्रस्तांमध्ये नाराजी असल्यामुळे आम्ही त्यांच्या विधानाचा जाहीर निषेध करीत आहोत. अधिकाऱ्यांनी यापुढे अभ्यास करूनच मत व्यक्त करावे.जनतेची दिशाभूल करू नयेमाजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील व माजी मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी मागील पुरात कर्नाटक सरकार आणि अलमट्टीतील अधिकाऱ्यांना विनंती करून अलमट्टीतून विसर्ग वाढविला होता. त्यानंतर कृष्णा नदीच्या पाण्याचा फुगवटा कमी होऊन सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांचा महापुराचा धोका टळला होता, असे दोन्ही मंत्र्यांनी जाहीर केले होते. पुरास अलमट्टीच जबाबदार असल्याचे त्यांचेही ते म्हणणे होते. असे असताना जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी चुकीचे विधान करून जनतेची दिशाभूल करू नये, असेही पाटील, दिवाण म्हणाले.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरfloodपूरDamधरण