शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

Sangli- कासेगाव खून प्रकरण: पिस्तूल पुरवणारा हत्यार तस्कर जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 17:59 IST

पोलिसांच्या कारवाईत आणखी एक पिस्तूल व काडतूस मिळाले

इस्लामपूर : कासेगाव (ता. वाळवा) येथे दि. १६ ऑगस्टच्या सकाळी साडेसातच्या सुमारास अनैतिक संबंधाच्या संशयातून एका सावकाराचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. या खुनासाठी पिस्तूल आणि काडतुसे पुरवणाऱ्या संशयिताला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून २० हजार रुपये किमतीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले. ही माहिती पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी दिली.रितेश संतोष वायदंडे (वय २२, रा. कामेरी, ता. वाळवा) असे अटक केलेल्या हत्यारांची तस्करी करणाऱ्याचे नाव आहे. कासेगावातील पांडुरंग भगवान शिद (वय ४३) याचा खून करण्यासाठी मुख्य सूत्रधार सुरेश ताटे याने रितेश वायदंडे याच्याकडून ५० हजार रुपयात पिस्तूल आणि काडतुसे विकत घेतली होती. या खून प्रकरणी पोलिसांनी सुरेश ताटे याच्यासह विशाल भोसले (कामेरी), शिवाजी भुसाळे (इस्लामपूर) अशा तिघांना अटक केली आहे.शिद याच्या खुनानंतर पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे फिरवताच वायदंडे याचे नाव रडारवर आले होते. त्यानुसार पोलिसांची पथके त्याच्या मागावर होती. त्यावेळी पथकातील हवालदार अनिल पाटील व दीपक हांडे यांना वायदंडे हा नेर्ले येथील बसस्थानक परिसरात असल्याची माहिती मिळाली होती. चारही पथकांनी या परिसराला वेढा टाकत त्याला ताब्यात घेत असताना तो पळून जाऊ लागला. त्याचा पाठलाग करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याची अंगझडती घेतली असता रितेश वायदंडे याने त्याच्या कमरेला लावलेले पिस्तूल आणि पॅन्टच्या खिशात ठेवलेले एक जिवंत काडतूस मिळून आले.पोलिस कर्मचारी प्रमोद रमेश पाटील यांनी रितेश वायदंडे याच्याविरोधात फिर्याद दिली आहे. या कारवाईत पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक हरिश्चंद्र गावडे, वाचक फौजदार जयनाथ चव्हाण, उपनिरीक्षक बाजीराव पाटील यांच्यासह सहायक फौजदार चंद्रकांत पवार, राजेंद्र पाटील, शरद जाधव, प्रशांत देसाई, विजय पाटील, सचिन चव्हाण, प्रमोद पाटील, संग्राम कुंभार, संदीप सावंत, सचिन पाटील यांनी भाग घेतला.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस