सांगली : उमेदवारांच्या खर्चावर आयकरचा वॉच, पूर्वतयारीचे आयोगाचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 16:27 IST2018-06-13T16:27:42+5:302018-06-13T16:27:42+5:30
आता राज्य निवडणुक आयोगाकडून उमेदवार व राजकीय पक्षांच्या खर्चावर वॉच ठेवण्यासाठी आयकर निरीक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे होऊ दे खर्चला यंदा चाप बसण्याची शक्यता आहे.

सांगली : उमेदवारांच्या खर्चावर आयकरचा वॉच, पूर्वतयारीचे आयोगाचे आदेश
सांगली : महापालिका निवडणुकीत मतदारांना प्रभावित करण्यासाठी तसेच प्रलोभन देण्यासाठी उमेदवार व राजकीय पक्षांकडून विविध क्लुप्या आखल्या जातात. चुरशीच्या प्रभागात तर मोठ्या प्रमाणात आर्थिक बळाचा वापर होतो. पण आता राज्य निवडणुक आयोगाकडून उमेदवार व राजकीय पक्षांच्या खर्चावर वॉच ठेवण्यासाठी आयकर निरीक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे होऊ दे खर्चला यंदा चाप बसण्याची शक्यता आहे.
महापालिका निवडणुकीचा आचारसंहिता आठवडाभरात लागू होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी राज्य निवडणुक आयोगाने महापालिकेला निवडणुकीची पूर्वतयारी करण्याची सूचना केली आहे. मतदान केंद्रांची निश्चिती, एव्हीएमची तयारी, उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रियेसह आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहे.
निवडणुक काळात उमेदवार व राजकीय पक्षांकडून मतदारांना प्रभावित करण्यासाठी आर्थिक बळाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अनेक प्रभागात दिग्गज उमेदवार आमने-सामने आल्यास पैशाचा चुराडा होत असतो.
अशा चुरशीच्या प्रभागातील उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी राज्य निवडणुक आयोगाकडूनच आयकर निरीक्षकाची नियुक्ती करणार आहे. या आयकर निरीक्षकांना ठराविक प्रभागातील विशिष्ट उमेदवारांवर वॉच ठेवणयची जबाबदारी दिली जाईल. प्रचार काळात भरारी पथकासह विविध यंत्रणामार्फत संबंधित उमेदवाराबद्दलचे पुरावे गोळा केले जाणार आहेत.