शहरं
Join us  
Trending Stories
1
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
2
मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण   
3
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
4
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
5
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
6
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
7
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
8
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
9
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
10
उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?
11
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
12
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
13
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
14
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
15
शिक्षण अकरावी, संपत्ती कोट्यवधी अन् डोक्यावर कर्ज; पाच वर्षात मिहिर कोटेचा बनले करोडपती
16
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 
17
राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद...
18
उद्धव ठाकरेंचे मत ‘हाता’ला, तर राज यांचे ‘धनुष्यबाणा’ला; लोकसभेला विचित्र योग
19
युद्धभूमीत मृत आईच्या पोटातून जिवंत बाळ! अख्खं कुटुंब हल्ल्यात ठार झालं

सांगली :  भिडेंच्या आंब्यांनी सोशल मिडियावर हास्यकल्लोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 3:13 PM

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी त्यांच्या शेतातील आंब्यांवरून केलेल्या विधानाने एकीकडे राजकीय पटलावर टीकाटिपणी सुरू असतानाच सोशल मिडियावर हास्यकल्लोळ सुरू झाला आहे. किस्से, विनोद, कविता आणि चारोळ््यांच्या माध्यमातून भिडे गुरुजींचे आंबे नेटकऱ्यांमुळे तेजीत आहेत.

ठळक मुद्देसांगली :  भिडेंच्या आंब्यांनी सोशल मिडियावर हास्यकल्लोळमोसमानंतरही आंबा तेजीत : किस्से, विनोद, कविता व्हायरल

सांगली : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी त्यांच्या शेतातील आंब्यांवरून केलेल्या विधानाने एकीकडे राजकीय पटलावर टीकाटिपणी सुरू असतानाच सोशल मिडियावर हास्यकल्लोळ सुरू झाला आहे. किस्से, विनोद, कविता आणि चारोळ््यांच्या माध्यमातून भिडे गुरुजींचे आंबे नेटकऱ्यांमुळे तेजीत आहेत.येथे भिडे गुरुजींच्या बागेतील आंबे मिळतील, आम्रसेवेने होती पुत्र-पुत्री, तर मग का करणे लागे पती?, प्रेयसीची प्रियकराला धमकी, लग्न करतोस की भिडेंच्या शेतातले आंबे खाऊ, तत्पर साऱ्या जनात, आमसूत्राचा बोलबोला,भिडे के आम इतने खास क्युं है?, आम खाओ, खुद जान जाओ, एकीकडे रामदेव बाबा, दुसरीकडे आमदेव बाबा अशा अनेक विनोदांची चलती सोशल मिडियावर आहे.

देश विदेशातील शास्त्रज्ञ भिडे गुरुजींच्या आंब्यावरील संशोधनासाठी भारतात दाखल, शासनाची आंबे योजना अशाप्रकारच्या सचित्र विनोदनिर्मितीनेही सोशल मिडिया व्यापला आहे.

गेल्या चार दिवसांपासून हा हास्यकल्लोळ सुरू आहे. आंब्यांचा मोसम संपला तरी भिडे गुरुजींच्या आंब्याची बाग नेटवर फुलली आहे. मनोरंजनाची, हास्याची चव चाखत या बागेवर नेटकऱ्यांनी यथेच्छ ताव मारण्यास सुरुवात केली आहे.आमच्या बागेतील आंबे खाल्ल्याने अपत्यप्राप्ती होते या भिडे गुरुजींच्या वक्तव्यावरून राजकीय लोकांकडून टीकाटिपणी सुरू आहे. राजकीय पटलावरही हा विषय चर्चेचा बनला आहे. तरीही सोशल मिडियावर राजकीय मते, टिकाटिपणीपेक्षा विनोद, किस्से आणि चारोळ््यांनाच अधिक पसंती मिळताना दिसत आहे.

पती-पत्नी, विद्यार्थी-शिक्षक या विभागातील विनोदांची गेल्या काही दिवसांपासून चलती होती. आता हे सर्व विनोद कालबाह्य होऊन त्याची जागा भिडे गुरुजींच्या आंब्यांनी घेतली आहे.

टॅग्स :Sambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीSangliसांगली