सांगली : शेखरवाडीत ग्रामपंचायत, दत्त मंदिर फोडले, चोरट्यांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 16:13 IST2018-10-05T14:33:56+5:302018-10-05T16:13:29+5:30

वाळवा तालुक्यातील शेखरवाडी व ऐतवडे बुद्रूक येथे गुरुवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. शेखरवाडीत ग्रामपंचायत व दत्त मंदिर फोडले, तर ऐतवडे बुद्रूकमध्ये खासगी रुग्णालयात चोरीचा प्रयत्न झाला.

 Sangli: The gram panchayat, the Dutt Temple, and the thieves of thieves in Shekharwadi | सांगली : शेखरवाडीत ग्रामपंचायत, दत्त मंदिर फोडले, चोरट्यांचा धुमाकूळ

सांगली : शेखरवाडीत ग्रामपंचायत, दत्त मंदिर फोडले, चोरट्यांचा धुमाकूळ

ठळक मुद्दे शेखरवाडीत ग्रामपंचायत, दत्त मंदिर फोडले, चोरट्यांचा धुमाकूळ ऐतवडे बुद्रूकमध्ये रुग्णालयात चोरीचा प्रयत्न

सांगली : वाळवा तालुक्यातील शेखरवाडी व ऐतवडे बुद्रूक येथे गुरुवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. शेखरवाडीत ग्रामपंचायत व दत्त मंदिर फोडले, तर ऐतवडे बुद्रूकमध्ये खासगी रुग्णालयात चोरीचा प्रयत्न झाला.



ग्रामपंचायत कार्यालय गुरुवारी सायंकाळी सहा वाजता बंद करण्यात आले होते. मध्यरात्री चोरट्यांनी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराची कुलूपे तोडून आत प्रवेश केला. कपाटातील साहित्य विस्कटले. महत्वाची कागदपत्रे व तीन हजाराची रोकड लंपास केली.

दत्त मंदिर रात्री आठ वाजता बंद करुन पुजारी घरी गेले होते. मध्यरात्री चोरट्यांनी मंदिराच्या दरवाजाची कुलूप तोडून प्रवेश केला. दानपेटी फोडून त्यामधील चिल्लर लंपास केली. ऐतवडे बुद्रूक येथे खासगी रुग्णालयाची मुख्य प्रवेशद्वाराची केवळ कुलपे तोडली.

Web Title:  Sangli: The gram panchayat, the Dutt Temple, and the thieves of thieves in Shekharwadi