सांगली: येथील अंकली येथे गोडाऊनला आग; लाखो रुपयांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 15:52 IST2019-04-08T15:49:52+5:302019-04-08T15:52:16+5:30
अंकली येथील गजानन महाराज मंदिर जवळ गोडाऊनला आग लागली आहे अंकली चे सरपंच सुनील पाटील यांच्या घराजवळ. गोडावून

सांगली: येथील अंकली येथे गोडाऊनला आग; लाखो रुपयांचे नुकसान
सांगली: अंकली येथील गजानन महाराज मंदिर जवळ गोडाऊनला आग लागली आहे अंकली चे सरपंच सुनील पाटील यांच्या घराजवळ. गोडावून च्या मागील बाजूस काटेरी झाड़े पेटवली असता उन्हाने आग भड़कली , यावेळी पेंट च्या गोडावून ला झळू बसून आग लागकी , ही आग इतकी मोठी आहे की , धुराने संपूर्ण परिसरात काळोख पसरल आहे.तर वाहतूक एकेरी बाजूने होते आहे.लाखो रुपयांचे नुकसान आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. अग्निशमन दाखल झाले असून परिसरातील नागरीकांचीही मोठी मदत सुरु आहे. या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून, पोलीस यंत्रणाही कार्यरत आहे. मात्र आग नेमकी कशामुळे लागली व गोडाऊन कोणाचे आहे याची अद्याप माहिती मिळू शकली नाही.