शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत रात्रीत सात ठिकाणी वाटमारी : टोळीचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 20:12 IST

सांगली : लुटमार करणाऱ्या तिघांच्या टोळीने बुधवारी रात्री धुमाकूळ घालत चाकूच्या धाकाने दीड तासात सातजणांना लुटले.

ठळक मुद्देकवलापुरात व्यापाऱ्यावर तलवारहल्ला; तीन लाखांचा ऐवज लंपासतिघांनी त्यांना चाकूच्या धाक दाखवून साडेसहा हजार रुपये किंमतीचा मोबाईल लंपास केला

सांगली : लुटमार करणाऱ्या तिघांच्या टोळीने बुधवारी रात्री धुमाकूळ घालत चाकूच्या धाकाने दीड तासात सातजणांना लुटले. सांगलीत सहा तर कवलापूर (ता. मिरज) येथे एक अशा या सात घटना घडल्या. टोळीने सात तोळे सोन्याचे दागिने, साठ हजाराची रोकड व तीन हजार रुपये किंमतीचे तीन मोबाईल असा तीन लाखाचा ऐवज लंपास केला.

कवलापूर येथे माळालगत मुख्य रस्त्यावर संतोष मारुती साबळे (वय २९) यांचे जय भवानी जनरल स्टोअर्स हे किराणा मालाचे दुकान आहे. रात्री साडेनऊ वाजता काळ्या रंगाच्या दुचाकीवरुन २५ ते ३० वयोगटातील तरुण आले. एकजण रस्त्यावरच दुचाकीवर बसून होता. अन्य दोघे थेट दुकानात गेले. एकाने चाकू काढून साबळे यांच्या गळ्याला लावला, तर दुसºयाने तलवारीचा धाक दाखवून ‘तुझ्याकडे जी काही रोकड आहे, ती काढून दे, आम्ही निघून जातो’, असे सांगितले. यावर साबळे यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे एकाने गल्ल्यात हात घालून १६ हजाराची रोकड काढून घेतली. साबळे यांनी आरडाओरड केल्यानंतर दुसºयाने त्यांच्या हातावर व मांडीवर तलवारहल्ला केला.

माधवनगर रस्त्यावर संपत चौकात देशी दारुचे दुकान आहेत. या दुकानातील कामगार मंजुनाथ पिरसंगप्पा (३१) हा दुकान बंद करुन त्याच्या शेजारील एका खोलीत झोपण्यासाठी गेला. तेवढ्यात त्याचा मित्र महिंद्र अरविंद कांबळे (३०, रा. पंचशीलनगर) हा आल्याने दोघे बोलत बसले होते. तिघांच्या टोळीने खोलीचा दरवाजा ठोठावला. दारु पिण्यास ग्राहक आले असेल, असा अंदाज करुन मंजूनाथने दरवाजा उघडला. त्यानंतर तिघेही खोलीत शिरले अन् त्यांनी मंजूनाथ व मित्र महिंद्रला गळ्याला चाकू लावला. दोघांच्या गळ्यातील सोन्याची चेन व बदाम तसेच मंजूनाथकडील दारु व्यवसायातील ४२ हजाराची रोकड लंपास केली. या घटनेनंतर तिघेही पंचशीलनगरमध्ये गेले. तेथील चौकातील अशोक रंगराव खराडे त्यांच्या किराणा मालाच्या दुकानाबाहेर कटट्यावर बसले होते. तिघांनी त्यांना चाकूच्या धाक दाखवून साडेसहा हजार रुपये किंमतीचा मोबाईल लंपास केला. याच मार्गावरुन निलेश दत्तात्रय ढोबळे (३२, पंचशीलनगर) हा दुचाकीवरुन घरी निघाला होता. टोळीने त्याच्याकडील २३ हजाराचा मोबाईल लंपास केला.पंचशीलनगरमध्ये लुटमार करण्यापूर्वी टोळी शंभरफुटी रस्त्यावरील फिरली. किसान चौकातील सुधीर शिवलींग सगरे (४६) हे औषधे आणण्यासाठी दुचाकीवरुन शंभरफुटी रस्त्यावरील दिगंबर मेडिकलमध्ये गेले होते. औषधे घेतल्यानंतर ते घरी निघाले होते. तिघांनी त्यांचा पाठलाग करुन दुचाकी आडवी मारुन थांबविले. त्यांच्या गळ्यातील अडीच तोळ्याचे चेन काढून घेतले. काही अंतरावर गेल्यानंतर तिघांनी चालत निघालेल्या विद्यासागर महावीर आवटे (३५, रा. त्रिकोणी बागेजवळ, सांगली) हा तरुणास अडवून त्याच्याकडील बाराशे रुपये काढून घेतले. या सर्व घटनांची सांगली शहर, संजयनगर व सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.टोळी पुन्हा सक्रिय :गेल्या दोन महिन्यापासून तिघांची टोळी तलवार व चाकूचा धाक दाखवून लूटमार करीत आहे. आठवड्यापासून हे प्रकार थांबले होते. पण सांगलीत कवलापूरला रात्रीत सात ठिकाणी या घटना घडल्याने भीतीचे वातावरण आहे. कोल्हापूरला अशाचप्रकारे लूटमार करणाºया सहाजणांच्या टोळीस पकडण्यात यश आले आहे. परंतु सांगली परिसरात तीन ‘डझन’हून अधिक गुन्हे झाले तरी पोलिसांना या टोळीचा सुगावा लागलेला नाही.टोळीचा पोलिसांना गुंगारासातही घटनामध्ये तिघांची टोळी आहे. ते २५ ते ३० वयोगटातील आहे. त्यांनी काळ्या रंगाची दुचाकी वापरली होती. कवलापूरला प्रथम लुटीची घटना घडल्यानंतर पोलिसांनी या भागात नाकाबंदी केली. तेवढ्यात शंभरफुटी रस्त्यावर दोन घटना घडल्यानंतर पोलीस तिकडे गेले. संपत चौक व पंचशीनगरमध्येही चार घटना घडल्याचे समजाच पोलीस चक्रावून गेले होते. पहाटेपर्यंत शहरात नाकाबंदी करुन तिघांचा शोध सुरु होता. पण पोलिसांना गुंगारा देण्यात ही टोळी पुन्हा एखदा यशस्वी झाली आहे.

 

टॅग्स :SangliसांगलीPolice Stationपोलीस ठाणे