शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांत जुलैमध्ये सर्वांत कमी पाऊस

By अशोक डोंबाळे | Updated: August 7, 2025 18:42 IST

गतवर्षीच्या तुलनेत किती टक्के पावसाची तूट.. वाचा

अशोक डोंबाळेसांगली : सर्वाधिक पावसासाठी ओळखल्या जाणाऱ्या जुलै महिन्यातच जिल्ह्यात पावसाची तब्बल १२२.७ टक्के तूट राहिली आहे. २०१५ नंतर पहिल्यांदाच जिल्ह्यात जुलै महिन्यात कमी पावसाची नोंद झाली आहे. दमदार पावसासाठी सांगलीकरांना अजून १५ ऑगस्टपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. दुष्काळी जत, आटपाडी तालुक्यात गतवर्षीपेक्षा सर्वाधिक पाऊस झाला आहे.जिल्ह्यात पावसाळ्यातील चार महिन्यांत सर्वाधिक १९८ मिलिमीटर पाऊस जून महिन्यात होतो. त्यानंतर १३५.५ मिलिमीटर पाऊस हा जुलै महिन्यात होत असतो. गेल्या अनेक वर्षांपासून जुलै महिन्यात दमदार पाऊस झाला आहे. २०२४ व २०२३ या वर्षांमध्ये २०० मिलिमीटरपेक्षा अधिकचा पाऊस जुलै महिन्यात झाला. मात्र, यंदा जुलै महिना कोरडाच गेला आहे. जुलै महिन्यात यंदा केवळ ११७.३ मिलिमीटर म्हणजेच केवळ ८६.६ टक्के पाऊस झाला आहे. गेल्या दहा वर्षांतील जुलै महिन्यातील पावसाची आकडेवारी पाहिल्यास जुलै २०२५ मध्ये पडलेला सर्वाधिक कमी पाऊस झाला आहे. जुलै २०२४ मध्ये २८३.६ मिलिमीटर म्हणजेच २०९.३ टक्के पाऊस झाला होता. कृष्णा, वारणा नद्यांना महापूर आला होता. अखंडित २९ दिवस पाऊस झाला आहे. गतवर्षीपेक्षा १६६.३ मिलिमीटर म्हणजेच १२२.७ टक्के कमी पाऊस झाला आहे.

पावसाची स्थिती

  • १०० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस झालेले तालुके - मिरज, जत, शिराळा, आटपाडी, कवठेमहांकाळ, पलूस
  • ४५ ते ८० टक्क्यांपर्यंत पाऊस झालेले तालुके - जामनेर, जळगाव, एरंडोल, मुक्ताईनगर.

जुलै महिन्यातील पावसाचे प्रमाणतालुका जुलै २०२४ / जुलै २०२५पाऊस / टक्केवारी / पाऊस / टक्केवारीमिरज २३३.०४ / २४८.५ / ९५.०३ / १०६जत ५७.५ / ८२ / ७३.९ / १०५.४खानापूर १५४.३ / १५५.९ / ५९.७ / ६०.३वाळवा ४५७.८ / २७७.६ / १३१.१ / ७९.५तासगाव १९६.७ / १८४.९ / ७७.६ / ७२.९शिराळा ८६१.८ / २८१.९ / ३९०.५ / १२७.३आटपाडी ५५.७ / १३९.९ / ९४.३ / २३६.९क.महांकाळ १२७.१ / २२६. / ७२.६ / १२९.२पलूस २९४.३ / ५०२.२ / १०६.४ / १८१.६कडेगाव २५९.४ / १७३.७ / ७०.१ / ४७एकूण २८३.६ / २०९.३ / ११७.३ / ८६.६

मे महिन्यात पाऊस झाल्यामुळे मान्सूनचे चित्र पालटले आहे. सध्या पावसासाठी पोषक वातावरण दिसून येत नाही. ऑगस्ट महिन्यात आगामी आठवडाभर तरी पावसाची शक्यता दिसून येत नाही. केवळ सांगली जिल्हाच नाही, तर राज्यातील अनेक भागांमध्ये हीच स्थिती आहे. ऑगस्ट महिन्यात पाऊस मोठ्या प्रमाणात होतो, तरी १५ ऑगस्टनंतर परिस्थिती बदलू शकते. -राहुल पाटील, हवामान तज्ज्ञ.