सांगली जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांत जुलैमध्ये सर्वांत कमी पाऊस

By अशोक डोंबाळे | Updated: August 7, 2025 18:42 IST2025-08-07T18:41:20+5:302025-08-07T18:42:26+5:30

गतवर्षीच्या तुलनेत किती टक्के पावसाची तूट.. वाचा

Sangli district has a rainfall deficit of 122 percent in the month of July alone | सांगली जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांत जुलैमध्ये सर्वांत कमी पाऊस

संग्रहित छाया

अशोक डोंबाळे

सांगली : सर्वाधिक पावसासाठी ओळखल्या जाणाऱ्या जुलै महिन्यातच जिल्ह्यात पावसाची तब्बल १२२.७ टक्के तूट राहिली आहे. २०१५ नंतर पहिल्यांदाच जिल्ह्यात जुलै महिन्यात कमी पावसाची नोंद झाली आहे. दमदार पावसासाठी सांगलीकरांना अजून १५ ऑगस्टपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. दुष्काळी जत, आटपाडी तालुक्यात गतवर्षीपेक्षा सर्वाधिक पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात पावसाळ्यातील चार महिन्यांत सर्वाधिक १९८ मिलिमीटर पाऊस जून महिन्यात होतो. त्यानंतर १३५.५ मिलिमीटर पाऊस हा जुलै महिन्यात होत असतो. गेल्या अनेक वर्षांपासून जुलै महिन्यात दमदार पाऊस झाला आहे. २०२४ व २०२३ या वर्षांमध्ये २०० मिलिमीटरपेक्षा अधिकचा पाऊस जुलै महिन्यात झाला. मात्र, यंदा जुलै महिना कोरडाच गेला आहे. जुलै महिन्यात यंदा केवळ ११७.३ मिलिमीटर म्हणजेच केवळ ८६.६ टक्के पाऊस झाला आहे. 

गेल्या दहा वर्षांतील जुलै महिन्यातील पावसाची आकडेवारी पाहिल्यास जुलै २०२५ मध्ये पडलेला सर्वाधिक कमी पाऊस झाला आहे. जुलै २०२४ मध्ये २८३.६ मिलिमीटर म्हणजेच २०९.३ टक्के पाऊस झाला होता. कृष्णा, वारणा नद्यांना महापूर आला होता. अखंडित २९ दिवस पाऊस झाला आहे. गतवर्षीपेक्षा १६६.३ मिलिमीटर म्हणजेच १२२.७ टक्के कमी पाऊस झाला आहे.

पावसाची स्थिती

  • १०० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस झालेले तालुके - मिरज, जत, शिराळा, आटपाडी, कवठेमहांकाळ, पलूस
  • ४५ ते ८० टक्क्यांपर्यंत पाऊस झालेले तालुके - जामनेर, जळगाव, एरंडोल, मुक्ताईनगर.


जुलै महिन्यातील पावसाचे प्रमाण

तालुका जुलै २०२४ / जुलै २०२५
पाऊस / टक्केवारी / पाऊस / टक्केवारी

मिरज २३३.०४ / २४८.५ / ९५.०३ / १०६
जत ५७.५ / ८२ / ७३.९ / १०५.४
खानापूर १५४.३ / १५५.९ / ५९.७ / ६०.३
वाळवा ४५७.८ / २७७.६ / १३१.१ / ७९.५
तासगाव १९६.७ / १८४.९ / ७७.६ / ७२.९
शिराळा ८६१.८ / २८१.९ / ३९०.५ / १२७.३
आटपाडी ५५.७ / १३९.९ / ९४.३ / २३६.९
क.महांकाळ १२७.१ / २२६. / ७२.६ / १२९.२
पलूस २९४.३ / ५०२.२ / १०६.४ / १८१.६
कडेगाव २५९.४ / १७३.७ / ७०.१ / ४७
एकूण २८३.६ / २०९.३ / ११७.३ / ८६.६

मे महिन्यात पाऊस झाल्यामुळे मान्सूनचे चित्र पालटले आहे. सध्या पावसासाठी पोषक वातावरण दिसून येत नाही. ऑगस्ट महिन्यात आगामी आठवडाभर तरी पावसाची शक्यता दिसून येत नाही. केवळ सांगली जिल्हाच नाही, तर राज्यातील अनेक भागांमध्ये हीच स्थिती आहे. ऑगस्ट महिन्यात पाऊस मोठ्या प्रमाणात होतो, तरी १५ ऑगस्टनंतर परिस्थिती बदलू शकते. -राहुल पाटील, हवामान तज्ज्ञ.

Web Title: Sangli district has a rainfall deficit of 122 percent in the month of July alone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.