सांगली जिल्ह्यात सभापती, उपसभापतींच्या निवडी मोठ्या जल्लोषात

By Admin | Updated: September 15, 2014 00:02 IST2014-09-14T23:05:12+5:302014-09-15T00:02:35+5:30

निवडणूक प्रक्रिया शांततेत करण्यास मदत केली

In the Sangli district, the election of Chairperson, Vice President, Vice Chairperson, | सांगली जिल्ह्यात सभापती, उपसभापतींच्या निवडी मोठ्या जल्लोषात

सांगली जिल्ह्यात सभापती, उपसभापतींच्या निवडी मोठ्या जल्लोषात

सांगली जिल्ह्यात सभापती, उपसभापतींच्या निवडी मोठ्या जल्लोषात पार पडल्या. यावेळी विरोधकांनी काही ठिकाणी मागे पाऊल घेत अखेर निवडीला साथ देत, ही निवडणूक प्रक्रिया शांततेत करण्यास मदत केली.

वैशाली माळी बनल्या खानापूरच्या सभापती
सुहास बाबर उपसभापती : बिनविरोध निवड
बैठकीत नावे निश्चित
खानापूर पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेल्या सर्व ७ सदस्यांची पक्षनिरीक्षक सुनील पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत सभापती पदासाठी सौ. माळी व उपसभापती पदासाठी बाबर यांची नावे निश्चित झाली. त्याप्रमाणे बैठकीत इतिवृत्त तयार करून सदस्यांनी या दोघांना मतदान करण्याबाबत पक्षनिरीक्षक सुनील पाटील यांनी पक्षादेश दिल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. मुळीक यांनी सांगितले.
भाळवणीत जल्लोष...
खानापूर पंचायत समितीच्या सभापतीपती सौ. वैशाली माळी यांची अपेक्षेप्रमाणे निवड झाल्याचे वृत्त भाळवणी गावात समजताच ग्रामस्थांनी जल्लोष केला. सौ. माळी या भाळवणी गावच्या स्नुषा असून, त्यांना दुसऱ्यांदा सभापती पदाची संधी मिळाली आहे. तालुक्याच्या विभाजनापूर्वी ज्येष्ठ नेते मोहनराव कदम व माजी आ. अनिल बाबर यांना सभापती पदाची दोनवेळा संधी मिळाली होती. त्यानंतर आता उच्चशिक्षित असलेल्या सौ. माळी यांना सभापतीपदी दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे.

जत पंचायत समितीवर जगतापांचेच वर्चस्व
सभापतीपदी लक्ष्मी मासाळ : उपसभापतीपदी बिरदादा जहागीरदार
फूट पाडण्याचा प्रयत्न
तालुक्याचे नेते विलासराव जगताप म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुमत असताना गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राष्ट्रवादीमधील सदस्यांत फूट पाडून काँग्रेसचा सभापती करण्याचा प्रयत्न सुरू केला होता. परंतु येथील सदस्यांनी त्यांचा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही. या निकालामुळे जिल्ह्यातील मंत्र्यांना चपराक बसली आहे.
पलूसच्या सभापतीपदी विजय कांबळे बिनविरोध

कडेगावच्या सभापतीपदी लता महाडिक यांची निवड
उपसभापती मुळीक : कार्यकर्त्यांचा जल्लोष

चंद्रकांत पाटील शिराळ्याचे सभापती
निवडी बिनविरोध : सम्राटसिंह नाईक उपसभापती
सर्वांना न्याय..!
पहिल्या टप्प्यात शिराळा तालुक्याच्या उत्तर विभागातील शारदाताई घारगे, त्यानंतर पश्चिम विभागातील शारदाताई पाटील यांना सभापती पदाची संधी मिळाली. आता सभापती पदाची संधी तालुक्याच्या दक्षिण भागातील सागाव गणाला देण्यात आली आहे. त्यामुळे सर्वांना समान न्याय मिळाल्याची भावना तालुक्यातून व्यक्त होत आहे.
मिरज पंचायत समितीच्या सभापतीपदी दिलीप बुरसे
उपसभापतीपदी तृप्ती पाटील : विरोधकांची माघार
तेजश्री चिंचकर यांना तीव्र विरोध
उपसभापती पदासाठी सत्ताधारी गटाचे विद्यमान उपसभापती माणिक चौधरी, बाबासाहेब कांबळे, जयश्री कब्बुरे, तेजश्री चिंचकर व तृप्ती पाटील हे इच्छुक होते. इच्छुकांच्या वाढत्या संख्येमुळे निवडीचा तिढा वाढला होता. ऐनवेळी उपसभापती पदासाठी तेजश्री चिंचकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. मात्र काँग्रेसच्या दहा सदस्यांनी नेते मदन पाटील यांची भेट घेऊन चिंचकर यांना तीव्र विरोध दर्शविला. त्यामुळे निर्णय बदलून उपसभापती पदासाठी बुधगावच्या तृप्ती पाटील यांचे नाव निश्चित करण्यात आले. विरोध डावलून चिंचकर यांच्या नावाला पसंती देण्याचा प्रयत्न झाला असता, तर बंडखोरी होण्याची शक्यता होती.
‘कवठेमहांकाळ’मध्ये निवडी बिनविरोध
वैशाली पाटील सभापती : कोळेकर उपसभापती
स्त्रीमध्ये नम्रता हवी : रामतीर्थकर
इस्लामपूर : चांगल्या स्त्रीमध्ये नम्रता, सामंजस्य, सहनशीलता व विनयशीलता असायला हवी. पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण न करता भारतीय संस्कृतीचा अंगीकार करावा, असे प्रतिपादन अ‍ॅड. अपर्णा रामतीर्थकर यांनी केले.
पेठनाका (ता. वाळवा) येथील श्री व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेच्या नानासाहेब महाडिक पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमध्ये अ‍ॅड. रामतीर्थकर यांचे ‘मुलींची जीवनशैली, धर्म जागृती व संस्कार प्रसारण’ या विषयावर व्याख्यान झाले. त्या पुढे म्हणाल्या, मुलींनी समाजात खंबीरपणे व ताठ मानेने उभे राहिले पाहिजे. शिक्षणातून समाजप्रबोधन केले पाहिजे. भारतीय संस्कृतीत ‘आई’ला अनन्य महत्त्व आहे. प्राचार्य महेश जोशी यांनी स्वागत केले. वर्षा पाटील, अनुजा तोडकर यांनी संयोजन केले. उपप्राचार्य सी. बी. पाटील व शिक्षक उपस्थित होते. स्वप्नाली साळुंखे यांनी आभार मानले. (वार्ताहर)

Web Title: In the Sangli district, the election of Chairperson, Vice President, Vice Chairperson,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.