शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
5
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
9
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
10
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
11
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
12
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
14
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
15
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
16
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
17
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
18
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
19
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
20
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका

सांगली जिल्ह्यातून १९५ टन डाळिंब, द्राक्षे युरोपला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 11:57 PM

जिल्ह्यातील आटपाडी, जत, तासगाव, खानापूर, कवठेमहांकाळ तालुक्यांसह मिरज पूर्व भागामध्ये जून २०१९ पर्यंत दुष्काळच पडला होता. पिण्याच्या पाण्यासाठी शंभरहून अधिक टँकर सुरु होते. डाळिंब बागा टँकरने जगविल्या.

ठळक मुद्देउत्पादन घटल्यामुळे तेजी । प्रतिकिलो द्राक्षाला ८० ते ११० रुपये, तर डाळिंबाला १०० रुपये दर

सांगली : दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे निर्यातक्षम द्राक्ष, डाळिंब बागांचे मोठे नुकसान झाल्यामुळे ४० टक्केपर्यंत उत्पादन घटले आहे. जिल्ह्यातून पाच कंटेनर डाळिंबे, तर आठ कंटेनरमधून द्राक्षे, अशी १९५ टन द्राक्षे व डाळिंबे युरोपीय राष्ट्रांत रवाना केली होती. प्रतिकिलो द्राक्षाला ८० ते ११० रुपये आणि डाळिंबाला १०० रुपये दर मिळाला आहे. येत्या आठवड्यात दरात युरोपमध्ये आणखी वाढ होईल, असा अंदाज आहे.

जिल्ह्यातील आटपाडी, जत, तासगाव, खानापूर, कवठेमहांकाळ तालुक्यांसह मिरज पूर्व भागामध्ये जून २०१९ पर्यंत दुष्काळच पडला होता. पिण्याच्या पाण्यासाठी शंभरहून अधिक टँकर सुरु होते. डाळिंब बागा टँकरने जगविल्या. खानापूर तालुक्यातील हिवरे, पळशी, करंजे, बेणापूर, खानापूर परिसरातील शेतकऱ्यांनी टँकरने द्राक्षबागा जगविल्या. आॅगस्ट २०१९ पासून सलग चार महिने मुसळधार पाऊस कोसळला.

ओढे-नाले ओसंडून वाहत होते. द्राक्ष, डाळिंब बागांमध्ये पाणीच पाणी साचून राहिल्यामुळे दावण्या रोगाचा फैलाव झाला. द्राक्षघडांची गळ झाली. डाळिंबावर ठिपके पडल्यामुळे ते निर्यातीसाठी पाठविताही येत नाहीत. काही शेतकऱ्यांनी मात्र या नैसर्गिक संकटावर मात करुन हिमतीने द्राक्ष, डाळिंब बागा जगविल्या आहेत. हे जरी खरे असले तरी, जिल्ह्यातील डाळिंब, द्राक्षबागांचे उत्पादन ४० टक्केपर्यंत घटले आहे.

निर्यातक्षम द्राक्षे, डाळिंबांना युरोपीय राष्ट्रात चांगला दर मिळत असल्याचे दिसत आहे. द्राक्ष, डाळिंब बागांचे उत्पादन घटल्याने शेतकºयांचे नुकसान झाले आहे. आम्ही युरोपीय राष्ट्रात पाच कंटेनरमधून ८० टन डाळिंबे निर्यात केली आहेत. भगव्या डाळिंबास सर्वाधिक पसंती असून प्रति किलो १०० रुपये दर मिळाला आहे, अशी माहिती निर्यातदार विशाल जोशी यांनी दिली.

मिरजेतील फळांचे निर्यातदार नासीर बागवान यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, युरोपमध्ये द्राक्षे, डाळिंबाला चांगली मागणी आहे. पण, तेवढा माल उपलब्ध नाही. आम्ही आठ कंटेनरमधून ११५ टन डाळिंबे व द्राक्षे निर्यात केली. हिरव्या द्राक्षांना प्रति किलो ७५ ते ८५ आणि काळ्या द्राक्षांना ९० ते ११० रुपये दर मिळत आहे. डाळिंबाचा दर्जा पाहून दर आहेत. मध्यम दर्जाच्या भगव्या डाळिंबाला प्रतिकिलो ६५ ते ७५ रुपये आणि चांगल्या दर्जाच्या डाळिंबाला प्रतिकिलो १०० रुपयापर्यंत दर मिळत आहे.

ख्रिसमसमुळे आणखी काही दिवस दर चढेच..या भागातील मालाची निर्यात डिसेंबरपासून चालू होऊन मार्चपर्यंत चालते. उन्हाळ्यात उत्पादनावर परिणाम होऊन मागणी घटते. यामुळे उर्वरित उत्पादन लोकल मार्केटला कमी दरात विकावा लागते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डाळिंबाचे वजन किमान २०० ग्रॅमच्या पुढे असायला हवे. यामुळे असा माल मर्यादित काळातच आपल्याकडे निघतो. या मालाला यावर्षी सुरूवातीच्या पंधरवड्यात ११० रुपये किलोला भाव मिळाला. मात्र यानंतर भावात घसरण होत गेली असली तरी, ख्रिसमसमुळे डिसेंबरमध्ये डाळिंबाचे दर ८० ते १०० रुपयांपर्यंत राहातील, असा दावा फळे निर्यातदार व्यापाऱ्यांनी केला आहे.

 

टॅग्स :SangliसांगलीMarketबाजार