शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Crime: यात्रा असल्याचे सांगून नवरी मुलीला माहेरी घेऊन गेले, अन्, परतच नाही पाठविले; तरुणाला घातला पाच लाखांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 18:18 IST

पत्नीला आणण्यासाठी गेला असता त्याच्याशी वाद घालून परत पाठविले

विटा : खोटे लग्न लावून तीन लाख १० हजार रुपये व एक लाख ५९ हजार ९३२ रुपयांचे सोन्याचे दागिने अशी चार लाख ६९ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सोमवारी विटा पोलिसांत कर्नाटकच्या नववधूसह पाचजणांविरुद्ध विटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. बामणी (ता. खानापूर) येथील नवरदेव दीपक शिवाजी सावंत (वय ३९) यांनी फिर्याद दिली.यावरून नववधू लक्ष्मी मल्लाप्पा नलवडे (रा. बैलहोंगल, कर्नाटक), अंजना दिलीप मलाईगोल (रा. हुपरी, जि. कोल्हापूर), शिवानंद मठपती स्वामी, त्याची पत्नी (दोघेही रा. गोकाक, ता. बेळगाव) व उमेश वाजंत्री या पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.दीपक सावंत याच्या विवाहासाठी गावातील मजूर आणि मूळचा कर्नाटकातील असलेल्या कलगोंडा पाटील याने शिवानंद स्वामी याच्याशी संपर्क साधला. स्वामी याने कर्नाटकातील बैलहोंगल येथील लक्ष्मी नलवडे हिचा विवाह करण्याचे असल्याचे सांगितले. दि. १७ नोव्हेंबर २०२२ रोजी लक्ष्मी, तिची मावशी बनून आलेली अंजना मलाईगोल, शिवानंद मठपती स्वामी, त्याची पत्नी व उमेश वाजंत्री असे पाचजण बामणी येथे रात्री ११ वाजता आले. त्यावेळी दीपक यास या सर्वांनी तीन लाख रुपये पाहिजेत तरच मुलीचे लग्न लावून देणार असे सांगितले. दीपकने गावातील काही प्रतिष्ठित लोकांना बोलावून त्याबाबत माहिती दिली. त्याच्या बैठकीत पैसे देण्याचे ठरले. त्यानुसार रोख ३ लाख १० हजार रुपये दिले. त्यानंतर दीपकने मुलीसाठी एक लाख ५९ हजार ९३२ रुपयांचे ३६ ग्रॅम ५०० मिली वजनाचे सोन्याचे दागिने केले. दि. १८ नोव्हेंबरला बामणी येथे सायंकाळी चार वाजता विवाह झाला. विवाह झाल्यानंतर मुलीचे नातेवाईक दि. १९ रोजी कर्नाटकात गेले.त्यानंतर दि. २४ रोजी गावची यात्रा असल्याने आम्ही नवरी मुलीला घेऊन जातो, असे सांगून नातेवाइकांनी लक्ष्मी हिला माहेरी घेऊन गेले. मात्र, परत बामणी गावी पाठविले नाही. त्यामुळे दीपक हा पत्नीला आणण्यासाठी गेला असता त्याच्याशी वाद घालून त्याला परत पाठविले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दीपकने लक्ष्मी, अंजना, शिवानंद मठपती स्वामी व त्याची पत्नी आणि उमेश वाजंत्री यांच्या विरोधात फसवणूक केल्याचा गुन्हा विटा पोलिसांत दाखल केला. सहायक पोलिस फौजदार एम. टी. मल्याळकर पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीmarriageलग्नCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस