CoronaVirus News: धक्कादायक! चाकूने गळा कापून कोरोना रुग्णाची आत्महत्या; सांगलीच्या रुग्णालयातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2020 14:48 IST2020-09-28T14:48:27+5:302020-09-28T14:48:45+5:30
आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही; दहा दिवसांपूर्वी दाखल करण्यात आले होते रुग्णालयात

CoronaVirus News: धक्कादायक! चाकूने गळा कापून कोरोना रुग्णाची आत्महत्या; सांगलीच्या रुग्णालयातील घटना
सांगली : मिरज येथील शासकीय कोविड रूग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाने चाकूने गळा कापून आत्महत्या केली. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. हुसेन बाबुमिया मोमीन (वय 55 रा. मालगाव रोड, अमननगर, मिरज) असे त्या रुग्णाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दहा दिवसापूर्वी कोरोना वरील उपचारासाठी मोमीन यांना मिरज कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी चाकूच्या साह्याने गळा कापून आत्महत्या केली. मिरज रुग्णालयातून याबाबत अधिकृत माहिती मिळाली नाही.
आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.