शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटी योजनेसाठी पहिल्या २० शहरात सांगलीचा समावेश

By admin | Updated: July 30, 2015 00:29 IST

मुंबईत सादरीकरण : महापालिकेच्या आशा पल्लवित

सांगली : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात राज्यातील २० शहरात सांगली महापालिकेचा समावेश करण्यात आला आहे. आता दुसऱ्या टप्प्यात यापैकी दहा शहरांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या स्मार्ट सिटीतील समावेशाबाबतच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. महापालिकेने स्मार्ट सिटीसाठी आराखडा तयार केला आहे. बुधवारी मुंबईत मुख्य सचिव स्वाधीन क्षेत्रीय, नगरविकास खात्याच्या सचिव मनीषा म्हैसकर यांच्यासह तांत्रिक समितीच्या आठ सदस्यांसमोर आयुक्त अजिज कारचे यांनी आराखड्याचे सादरीकरण केले. यावेळी उपायुक्त डॉ. प्रशांत रसाळ, प्रशासन अधिकारी नकुल जकाते उपस्थित होते. स्पर्धेतील निकषानुसार महापालिकेने स्वत:ला स्वयंमूल्यांकनात ५७ गुण दिले होते. गेल्या आठवड्यात मुंबईत झालेल्या बैठकीत गुणानुक्रम पडताळणीत पालिकेला ८३ गुण मिळाले होते. आराखडा सादरीकरणावेळी आयुक्तांनी शहरातील विविध योजनांचा लेखाजोखा, पाणीपुरवठा व इतर नागरी सुविधा, रस्त्यांच्या स्थितीचा आढावा घेतला. त्यात एलबीटीमुळे पालिकेची आर्थिक स्थिती खालावली असतानाही सांगली महापालिकेने नागरी सुविधांबाबत घेतलेल्या दक्षतांची मांडणी केली. स्मार्ट सिटीअंतर्गत राज्यातील पहिल्या २० शहरांत सांगलीचा समावेश करण्यात आला. यातून आता दहा शहरांची निवड केली जाणार आहे. (प्रतिनिधी)