सांगली : स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेअंतर्गत स्वच्छता अॅपमध्ये सांगली राज्यात प्रथम, देशात १५ व्या क्रमांकावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 13:00 IST2018-02-16T12:52:44+5:302018-02-16T13:00:04+5:30
शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेअंतर्गत स्वच्छता अॅपमध्ये सांगली महापालिका महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर, तर देशात १५ व्या क्रमांकावर आहे. स्वच्छताअॅप स्पर्धेत महापालिकेने सातत्य राखल्यास किमान २० कोटींचे अनुदान मिळणार आहे. स्वच्छतेत लोकसहभाग वाढविण्यासाठी आयुक्त रवींद्र खेबूडकर, उपायुक्त सुनील पवार हे प्रयत्नशील आहेत.

सांगली : स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेअंतर्गत स्वच्छता अॅपमध्ये सांगली राज्यात प्रथम, देशात १५ व्या क्रमांकावर
सांगली : शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेअंतर्गत स्वच्छता अॅपमध्ये सांगली महापालिका महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर, तर देशात १५ व्या क्रमांकावर आहे. स्वच्छताअॅप स्पर्धेत महापालिकेने सातत्य राखल्यास किमान २० कोटींचे अनुदान मिळणार आहे. स्वच्छतेत लोकसहभाग वाढविण्यासाठी आयुक्त रवींद्र खेबूडकर, उपायुक्त सुनील पवार हे प्रयत्नशील आहेत.
सात दिवसांपूर्वी स्वच्छ अॅपमध्ये सांगली महापालिका राज्यात दुसऱ्या क्रमांकावर होती, तर देशात १७ व्या क्रमाकांवर होती. आता सांगली महापालिका राज्यात पहिल्या स्थानावर आली आहे. प्रशासनाने स्वच्छता, कचरा उठाव याबरोबर नागरिकांसाठी स्वच्छ अॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन केले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
जानेवारीपासून अॅप डाऊनलोड करण्यास सुरुवात केली आहे. एक ते दहा लाखापर्यंत लोकसंख्या असणाऱ्या शहरांसाठी ही स्पर्धा आहे. आतापर्यंत १९ हजार १२० अॅप डाऊनलोड केले आहेत. चार हजारहून अधिक नागरिक भागातील तक्रारी अॅपवर डाऊनलोड करीत आहेत. या तक्रारींचे २४ तासात निराकरण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. गेल्या आठवडाभरात शहराचे गुणांकन वाढले आहे.
घराघरातील कचरा नियमित उचलला जावा, यासाठी ई-रिक्षा घंटागाडीची खरेदी करण्यात येणार आहे. नुकतेच नवीन नऊ रिक्षाघंटागाड्या घेतल्या आहेत. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. यापासून तयार झालेले खत विकण्यासाठी बचतगटांना काम देण्याचे नियोजन आहे. प्लास्टिकमुक्तीसाठी बचत गटाच्या महिलांना कापडी पिशव्या तयार करण्याचे काम दिले आहे. प्रशासनाने महापालिकेला स्वच्छता अभियनात देशात नावलौकिक प्राप्त करून देण्याचा निर्धार केला आहे.
केंद्रीय पथक २२ रोजी सांगलीत येणार
शहराचे स्वच्छ सर्वेक्षण करण्यासाठी केंद्रीय पथक २२ रोजी सांगलीत येणार आहे. या पथकाकडून स्वच्छतेबाबत महापालिका राबवत असलेल्या उपाययोजनांची तपासणी केली जाणार आहे. काही भागाला भेटी देणार आहेत. नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी त्यांच्याशीही चर्चा करणार आहे.