स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोडींगसाठी खामगाव पालिकेची विशेष मोहिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 01:17 PM2017-12-27T13:17:15+5:302017-12-27T13:17:31+5:30

खामगाव: स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या उद्दीष्टपूर्तीत आगेकूच करण्यासाठी देशपातळीवर विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. स्वच्छता  स्पर्धेत आपण कोठेही मागे राहू नये, यासाठी पालिका कर्मचारी- अधिकाऱ्यांची धावपळ सुरू असून, आता पालिकेने ‘स्वच्छता अ‍ॅप’ डाऊनलोडींग मोहिम हाती घेतली आहे.

Khamgaon Municipal Special Campaign for Downloading Cleanliness App | स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोडींगसाठी खामगाव पालिकेची विशेष मोहिम

स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोडींगसाठी खामगाव पालिकेची विशेष मोहिम

Next

खामगाव: स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या उद्दीष्टपूर्तीत आगेकूच करण्यासाठी देशपातळीवर विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. स्वच्छता  स्पर्धेत आपण कोठेही मागे राहू नये, यासाठी पालिका कर्मचारी- अधिकाऱ्यांची धावपळ सुरू असून, आता पालिकेने ‘स्वच्छता अ‍ॅप’ डाऊनलोडींग मोहिम हाती घेतली आहे. अपेक्षीत उद्दीष्ट गाठण्यासाठी कर्मचाºयांच्या चमू विशेष मोहिमेतंर्गत नागरिकांना स्वत:हून स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करून देत आहेत.

स्वच्छ भारत अभियानातंर्गत देशातील शहरं हगणदरी मुक्त करण्यासाठी सन २०१६ पासून प्रयत्न केल्या जात आहेत. स्वच्छ शहराच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या शहराची जिल्हास्तर, राज्य स्तरासोबतच केंद्रीय स्तरावरून पाहणी करण्यात येणार असून विविध ३४ मुद्यांच्या आधारे नागरिकांच्या सहभागातून सर्वेक्षण पूर्ण करण्यात येणार आहे. त्यादृष्टीकोनातून पालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. स्वच्छ  भारत अभियानातंर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०१८ ही देशव्यापी  स्पर्धा सुरू असून या स्पर्धेमध्ये खामगाव शहराचे रँकींग उंच ठेवण्यासाठी स्वच्छता कायम राखण्यासाठी खामगाव नगर पालिका प्रशासनाद्वारे अ‍ॅड्राईड मोबाईलचा स्वच्छता अ‍ॅप कार्यान्वित करण्यात आला आहे. हा स्वच्छता अ‍ॅप  पालिका कर्मचाºयांनी स्वत:च्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यासोबतच इतर २०-२५ जणांच्या मोबाईलमध्ये डाऊनलोडींगचे उद्दीष्ट देण्यात आले असून, तसा अहवाल सादर करण्याचे  निर्देशही  विभागप्रमुख, अधिकारी आणि कर्मचाºयांना देण्यात आले आहेत.

कर्तव्यात कसूर केल्यास कारवाई!

स्वच्छ महाराष्ट्र अभियानातंर्गत स्वच्छ सर्वेक्षण-२०१८ स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करून अहवाल सादर करण्याच्या सूचना पालिकेच्या सर्व विभाग प्रमुख, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. प्रत्येक कर्मचाºयाला प्रत्येकी २०-२५ जणांचे उद्दीष्ट ठरवून देण्यात आले. दरम्यान, या उद्दीष्टाबाबत अहवालही नियमितपणे घेण्यात येत असून, २६ डिसेंबरपर्यंत उद्दीष्ट पूर्तीचा लक्षांक न गाठणाºया कर्मचाऱ्यां ना २७ डिसेंबर रोजी मुख्याधिकाºयांनी समज दिला. पालिका विभाग प्रमुख, अधिकारी आणि कर्मचाºयांची कानटोचणीही करण्यात आली. दरम्यान, या कर्मचाºयांना उद्दीष्टपूर्तीसाठी वाढीव मुदत देण्यात आली. त्यानंतर बुधवारी सकाळपासून पालिका कर्मचाºयांनी एक विशेष मोहिम हाती घेतली आहे.


गुड मॉर्निंग पथकांना विश्रांती!

शहर हगणदरी मुक्त म्हणून घोषित झाल्यानंतर शहरात कार्यान्वित करण्यात आलेल्या गुड मॉर्निंग पथकांना पालिका प्रशासनाकडून विश्रांती देण्यात आली होती.  मात्र, आगामी स्वच्छ सर्वेक्षणातंर्गत तपासणीसाठी केंद्रीय पथक खामगावात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दाखल होणार आहे. परिणामी, येत्या आठवड्यात गुड मॉर्निंग आणि गुड ईव्हीनिंग पथके पुन्हा कार्यान्वित होणार असल्याचे संकेत आहेत. 

Web Title: Khamgaon Municipal Special Campaign for Downloading Cleanliness App

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.