सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात मंगळवारी रात्री अचानक आलेल्या वादळी पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडवली. रात्री सुमारे पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास सुरू झालेल्या जोरदार वाऱ्यासह गारपिटीच्या पावसाने तब्बल तासभर हजेरी लावली. वादळी वाऱ्याचा वेग इतका होता की, शहरातील अनेक भागांत झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर कोसळल्या. काही ठिकाणी वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला.मेघगर्जनेसह वादळी पावसामुळे सांगलीतील कॉलेज कॉर्नर, अमराई परिसर, घनश्याम नगर, चिंतामणीनगरसह उपनगरांतील वीजपुरवठा खंडित झाला. गारांचा वर्षाव सांगलीकरांनी अनुभवला. सुमारे तासभर वीज नसल्याने अनेक भाग अंधारात होते. वीज वितरण यंत्रणेकडून तत्काळ दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्यानंतर पुरवठा पूर्ववत करण्यात आला.या अवकाळी पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी वादळी वाऱ्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे नुकसानही झाले. सुदैवाने जीवितहानीची कोणतीही घटना घडली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. हवामानातील अचानक बदलामुळे पुढील काही दिवस सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
Web Summary : A sudden storm with hail struck Sangli, Miraj, and Kupwad, disrupting power and damaging trees. Residents experienced an hour-long blackout. While the rain offered relief from the heat, officials urge caution due to unpredictable weather. No casualties were reported.
Web Summary : सांगली, मिरज और कुपवाड में अचानक ओलावृष्टि के साथ आए तूफान से बिजली गुल हो गई और पेड़ क्षतिग्रस्त हो गए। निवासियों ने एक घंटे तक ब्लैकआउट का अनुभव किया। बारिश से गर्मी से राहत मिली, लेकिन अधिकारियों ने अप्रत्याशित मौसम के कारण सावधानी बरतने का आग्रह किया। किसी के हताहत होने की खबर नहीं है।