शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: पत्र्याचे शेड मारण्याच्या कारणावरून तरुणाचा निर्घृण खून, चार जणांना अटक; आरोपीच्या घरावर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 16:19 IST

जत : जत शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या अचकनहळ्ळी येथे पत्र्याचे शेड मारण्याच्या कारणावरून हिरोल उर्फ बाबू मल्लाळकर (वय ...

जत : जत शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या अचकनहळ्ळी येथे पत्र्याचे शेड मारण्याच्या कारणावरून हिरोल उर्फ बाबू मल्लाळकर (वय २६) याचा लाकडी दांडके डोक्यात मारून निर्घृण खून करण्यात आला. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.आरोपी मंजुनाथ नारायण काळे (वय २५), कऱ्याप्पा रामाण्णा कग्गोड, सावित्री नारायण काळे आणि चंदाबाई कऱ्याप्पा कग्गोड (सर्व रा.अचकनहळ्ळी, ता.जत) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.गावात गायरान जागेवर आरोपी आणि हिरोल मल्लाळकर एकमेकाचे शेजारी आहेत. पत्र्याची शेड मारण्याच्या कारणावरून आणि रस्त्याच्या वाटेसाठी झालेल्या वादातून त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. मल्लाळकर यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पत्र्याची शेड मारत असताना हिरोल याने त्याला विरोध केला. त्याचा राग आल्याने आरोपींनी त्यास धक्काबुक्की केली. यावेळी मंजुनाथ काळे याने लाकडी दांडक्याने हिरोल याच्या डोक्यात, पाठीवर जोरदार मारहाण केली.या मारहाणीत हिरोल याचा मृत्यू झाला. हिरोल हा मृत झाल्यानंतर त्याच्या नातेवाइकांनीही काळे याच्या घरावर हल्ला करून घरातील साहित्याची तोडफोड केली, तसेच घरापुढे असलेल्या टेम्पोच्या काचा फोडून गाडीचे नुकसान केले. त्यामुळे मंगळवारी सकाळी आरोपीच्या घरापुढे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

घटनेची माहिती ग्रामस्थांनी जत पोलिसांना दिली. तत्काळ जत पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जत ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. मंगळवारी पहाटे विच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.या प्रकरणी मृताची आई सावित्री रामचंद्र मल्लाळकर यांनी चार जणांविरुद्ध जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रात्री उशिरा या घटनेची नोंद जत पोलिस ठाण्यात झाली आहे. पोलिसांनी चौघांनाही अटक केली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर करीत आहेत.

सात दिवसांची पोलिस कोठडीअचकनहळ्ळी येथील हिरोल मल्लाळकर खूनप्रकरणी चार आरोपींना मंगळवारी जत येथील न्यायालयापुढे पोलिसांनी हजर केले. न्यायालयाने या चार संशयित आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसjat-acजाट