शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

तस्करीच्या सोन्यातून दागिने घडवणारे सांगली बनतेय केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 12:43 IST

Crimenews Sangli : देशभरातील सोने तस्करीच्या गुन्ह्यांचे धागेदोरे सांगलीपर्यंत पोहोचू लागले आहेत. केरळमध्ये वर्षभरापूर्वी उघडकीस आलेल्या सोने तस्करीच्या तपासादरम्यान, किमान १०० किलो सोने आजवर सांगलीला पाठवल्याचे तपास संस्थांना आढळले आहे. दरम्यान, तपास संस्थांचे अधिकारी सांगलीत मुक्काम ठोकून आहेत.

ठळक मुद्देतस्करीच्या सोन्यातून दागिने घडवणारे सांगली बनतेय केंद्रतपास संस्थांचा सांगलीत मुक्काम

संतोष भिसे सांगली : देशभरातील सोने तस्करीच्या गुन्ह्यांचे धागेदोरे सांगलीपर्यंत पोहोचू लागले आहेत. केरळमध्ये वर्षभरापूर्वी उघडकीस आलेल्या सोने तस्करीच्या तपासादरम्यान, किमान १०० किलो सोने आजवर सांगलीला पाठवल्याचे तपास संस्थांना आढळले आहे. दरम्यान, तपास संस्थांचे अधिकारी सांगलीत मुक्काम ठोकून आहेत.सांगलीतील शेकडो गलई व्यावसायिक व्यवसायाच्या निमित्ताने देशभरात विखुरले आहेत, त्यापैकी काहीजण सोने तस्करीशी संबंधित असल्याचे वेळोवेळी आढळले आहे. तीनच आठवड्यांपूर्वी कर्नाटकात हरियुरजवळ नऊ कोटींच्या सोन्याच्या तस्करी उघडकीस आली होती. वडगाव व कवलापुरच्या दोघा तरुणांना महसुल व गुप्तचर संचालनालयाने पकडले होते. गेल्या पंधरवड्यातही दिल्लीत रेल्वे स्थानकावर तस्करीचे ४३ किलो सोने पकडण्यात आले, त्यामध्येही सांगलीच्या काही तरुणांचा संबंध चर्चेत आहे.केरळच्या अवघ्या राजकारणाला भंडावून सोडलेल्या सुवर्ण तस्करी प्रकरणाचे धागेदोरेही थेट सांगलीपर्यंत पोहोचले आहेत. तपास संस्थांनी या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या संशयिताने तस्करीचे तब्बल शंभर किलोहून अधिक सोने सांगलीला पाठवल्याची माहिती तपासाधिकाऱ्यांना दिली होती.यामुळे सांगली जिल्हा सातत्याने सोने तस्करीच्या नकाशावर येत आहे. तस्करीच्या सोन्यातून दागिने घडविण्यासाठी सांगली हे एक महत्वाचे केंद्र बनत असल्याची टिप्पणी तपास संस्थांनी केली आहे. सोने वितळवून दागिने घडवले जात असल्याचे निरिक्षण आहे. त्यामुळे तपासाची सुई प्रामुख्याने काही गलई व्यावसायिकांकडे वारंवार वळत आहे.तपास संस्थांचा सांगलीत मुक्कामराष्ट्रीय तपास संस्थांचा मुक्काम शुक्रवारपासून सांगलीत आहे. स्थानिक पोलीसांच्या मदतीने त्यांचा तपास सुरु आहे. पण नेमक्या कोणत्या तस्करी प्रकरणात सांगलीकडे त्यांच्या घिरट्या आहेत हे स्पष्ट झाले नाही. हरियुरजवळ सापडलेले सोने आणि दिल्लीत रेल्वे स्थानकावर पकडलेली तस्करी या दोहोंपैकी नेमका कोणता तपास सुरु आहे हे स्पष्ट झाले नाही.

टॅग्स :PoliceपोलिसSangliसांगली