शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

सांगली : कुकटोळीत घरावर सशस्त्र दरोडा दाम्पत्यास मारहाण : साडेअठरा लाखाची रोकड लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 2:37 PM

कुकटोळी (ता. कवठेमहांकाळ) येथील कुंडलिक पांडूरंग वासुदकर (वय ४३) यांच्या घरावर सहा जणांच्या टोळीने सशस्त्र दरोडा टाकून सुमारे साडेअठरा लाखाची रोकड लंपास केली.

ठळक मुद्देसांगली : कुकटोळीत घरावर सशस्त्र दरोडा दाम्पत्यास मारहाण : साडेअठरा लाखाची रोकड लंपास. कुºहाडीने कपाटाचा हॅण्डल लॉक तोडला. लॉकरमधील साडेअठरा लाख रुपयांची रोकड लंपास करुन टोळीने पलायन केले. 

सांगली : कुकटोळी (ता. कवठेमहांकाळ) येथील कुंडलिक पांडूरंग वासुदकर (वय ४३) यांच्या घरावर सहा जणांच्या टोळीने सशस्त्र दरोडा टाकून सुमारे साडेअठरा लाखाची रोकड लंपास केली. टोळीने वासुदकर यांच्यासह त्यांच्या पत्नी रुपाली (३८) यांना बेदम मारहाण केली. सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली.

कुंडलिक वासुदकर हे पत्नी, आई-वडिल व मुलींसमवेत वासुदकर वस्तीवर राहतात. सोमवारी रात्री वासूदकर कुटूंब जेवण करुन झोपी गेले होते. मध्यरात्री दोन वाजता सहा जणांच्या टोळीने त्यांच्या घराच्या दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. दरवाजा तुटल्याच्या आवाजाने वासूदकर कुटूंब जागे झाले. टोळीने कुºहाड व चाकूचा धाक दाखविला. कुंडलिक यांना पोटात लाथा मारल्या. त्यांच्या पत्नी रुपाली यांच्या उजव्या हातावर काठीने मारहाण केली. त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसडा मारुन काढून घेतले. कुºहाडीने कपाटाचा हॅण्डल लॉक तोडला. लॉकरमधील साडेअठरा लाख रुपयांची रोकड लंपास करुन टोळीने पलायन केले. 

टोळीने अवघ्या पंधरा मिनीटात वासुदकर यांच्या घरावर दरोडा टाकला. या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे, सहाय्यक निरीक्षक अमितकुमार पाटील व कवठेमहांकाळ पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. टोळीच्या शोधासाठी कवठेमहांकाळ तालुक्यात नाकाबंदी करण्यात आली होती. पहाटेपर्यंत संशयित वाहने थांबवून चौकशी सुरु होती. पण काहीच धागेदोरे लागले नाहीत. याप्रकरणी कुंडलिक वासुदकर यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड तपास करीत आहेत. 

जमीन विक्रीची रक्कमवासुदकर यांनी सोमवारी त्यांच्या जमीन विक्रीचा व्यवहार केला होता. यातून ही साडेअठरा लाखाची रोकड त्यांच्याजवळ आली होती. ही रोकड ते मंगळवारी बँकेत भरण्यास जाणार होते. तोपर्यंत टोळीने त्यांच्या घरावर दरोडा टाकून ही रोकड पळविली. दरोडेखोर हे परिसरातील असावेत. वासुदकर यांच्याकडे जमीन विक्रीतून साडेअठरा लाख रुपये आले आहेत, याची माहिती असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. 

मराठीत बोलणेदरोडेखोर २० ते २१ वयोगटातील होते. एकजण मध्यम, तर अन्य पाचजण अंगाने सडपातळ होते. एकाने काळ्या रंगाचा फूल टी-शर्ट व नाईट पॅन्ट घातली होती. रुपाली यांना मारहाण करणाºया दरोडेखोराने काळ्या रंगाचे जॅकेट घातले होते. सर्वजण मराठीत बोलत होते. त्यांनी तोंडाला रुमाल बांधले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगलीPolice Stationपोलीस ठाणे