सांगली: ..अन् रस्त्यातील खड्ड्यातच उभा केले बुजगावनं, युवक, ग्रामस्थांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 12:34 IST2022-08-16T12:34:04+5:302022-08-16T12:34:48+5:30

मानाजी धुमाळ रेठरे धरण : धुवाधार पाऊस अन् निकृष्ट कामामुळे रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात ...

Sangli: ..and Bujgaon raised the anger of the youth and villagers in the pothole in the road | सांगली: ..अन् रस्त्यातील खड्ड्यातच उभा केले बुजगावनं, युवक, ग्रामस्थांचा संताप

सांगली: ..अन् रस्त्यातील खड्ड्यातच उभा केले बुजगावनं, युवक, ग्रामस्थांचा संताप

मानाजी धुमाळ

रेठरे धरण : धुवाधार पाऊस अन् निकृष्ट कामामुळे रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी रस्ते मार्गाची अवस्था झाली आहे. इस्लामपूर ते चिकूर्डे ता. वाळवा या रस्त्यावर वाघवाडी येथील मुख्य चौकातील देखील अशीच अवस्था आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी वाघवाडी येथील संतप्त युवक व ग्रामस्थांनी खड्ड्यात चक्क बूजगावने उभा करून निषेध केला.

इस्लामपूर ते चिकूर्डे या मार्गावर पुणे-बंगलोर महामार्गाच्या पश्चिमेला असलेल्या व मिनी बाजारपेठ असलेल्या वाघवाडी येथील चौकात रस्त्यात ठिकठिकाणी मोठं मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनांचे वारंवार अपघात होत आहेत. याच मार्गावर बाजारपेठ वसली असून तालुक्यातील ग्राहकांची याठिकाणी खरेदीसाठी गर्दी होत असते. त्यामुळे या मार्गावरुन शालेय विद्यार्थ्यांना, वाहनधारकांना कसरत करावी लागते. अनेकदा ग्रामस्थांनी संबंधित खात्याकडे तक्रार करून देखील याप्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थ व युवकांनी या खड्ड्यात चक्क बुजगावने उभा करून प्रशासनाचा निषेध केला.

Web Title: Sangli: ..and Bujgaon raised the anger of the youth and villagers in the pothole in the road