corona virus : सांगलीत ८५ वर्षीय आजीने केली कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 15:42 IST2020-09-29T15:39:38+5:302020-09-29T15:42:27+5:30
महापालिकेच्या आदिसागर कोविड सेंटरमध्ये ८५ वर्षीय आजीने कोरोनावर मात केली. आदिसागरच्या कर्मचाऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात आजीबाईंना निरोप दिला. कोविड सेंटरमधील सुविधा व वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सेवेबद्दल त्यांनी आभार मानले.

corona virus : सांगलीत ८५ वर्षीय आजीने केली कोरोनावर मात
सांगली : महापालिकेच्या आदिसागर कोविड सेंटरमध्ये ८५ वर्षीय आजीने कोरोनावर मात केली. आदिसागरच्या कर्मचाऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात आजीबाईंना निरोप दिला. कोविड सेंटरमधील सुविधा व वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सेवेबद्दल त्यांनी आभार मानले.
सांगलीत राहणाऱ्या ८५ वर्षीय महिलेला १९ सप्टेंबर रोजी महापालिकेच्या आदिसागर कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या ऑक्सिजनची पातळी खालावली होती. वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. रवींद्र ताटे, समन्वयक इरफान चौगले यांच्या नेतृत्वाखाली पथकाने त्यांच्यावर उपचार केले.
आठ दिवसांच्या उपचारानंतर आजीबाईंनी कोरोनावर यशस्वी मात केली. सोमवारी आजींना
डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी कोविड सेंटरमधील कर्मचाऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना निरोप दिला.