शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

सांगलीत कॉँग्रेसचा मूक मोर्चा, निदर्शने : केंद्र शासनाच्या धोरणांचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 01:12 IST

केंद्रातील भाजप सरकारने दिलेल्या खोट्या आश्वासनांचा निषेध म्हणून सांगली शहर जिल्हा कॉँग्रेसच्यावतीने शनिवारी मूक मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देपदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पाळला ‘विश्वासघात दिन’

सांगली : केंद्रातील भाजप सरकारने दिलेल्या खोट्या आश्वासनांचा निषेध म्हणून सांगली शहर जिल्हा कॉँग्रेसच्यावतीने शनिवारी मूक मोर्चा काढण्यात आला. दिलेली आश्वासने सरकारने पाळली नाहीत म्हणून कार्यकर्त्यांनी ‘विश्वासघात दिन’ पाळला.

सांगलीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ््यास अभिवादन करून मोर्चास सुरुवात करण्यात आली. मारुती रोड, हरभट रोड, राजवाडा चौक मार्गे स्टेशन चौकात महात्मा गांधी पुतळ्याजवळ मोर्चाचा समारोप झाला. मूक मोर्चा संपल्यानंतर स्टेशन चौकात पृथ्वीराज पाटील म्हणाले, भाजपने देशभरातील जनतेचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे आम्ही आजचा दिवस विश्वासघात दिन म्हणून पाळला आहे. निवडणुकीपूर्वी अनेकप्रकारची आश्वासने या सरकारने जनतेला दिली होती,

मात्र सत्ता मिळाल्यावर त्यांना याचा विसर पडला. गेल्या चार वर्षात केंद्र सरकार महागाई कमी करण्यात, बेरोजगारांना रोजगार देण्यात अपयशी ठरले. इंधन दरवाढीने तर सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडण्याचे काम सरकारने केले. जनतेच्या हिताचे एकही धोरण सरकारने राबविले नाही.मोर्चात जिल्हाध्यक्ष आ. मोहनराव कदम, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांच्यासह नगरसेवक राजेश नाईक, संतोष पाटील, दिलीप पाटील, शेवंता वाघमारे, राजन पिराळे, बिपीन कदम, मदनभाऊ युवा मंचचे अमोल झांबरे, प्रकाश मुळके, संजय पवार, अमित पारेकर, कय्युम पटवेगार, रवींद्र खराडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या चार वर्षांच्या अपयशी कारभाराचा निषेध व्यक्त करीत कॉँग्रेसच्या महिला आघाडीच्यावतीने शनिवारी सांगलीत जोरदार निदर्शने करण्यात आली.येथील कॉँग्रेस भवनसमोर आंदोलन करण्यात आले. महिला कॉँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा शैलजाभाभी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. ‘जगण्यासाठी भाषण नाही, राशन द्या’, ‘या सरकारचे करायचे काय, खाली डोके, वर पाय’ अशा घोषणा देत मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या.

यावेळी शैलजाभाभी पाटील म्हणाल्या की, केंद्र सरकारला चार वर्षे पूर्ण झाली तरी सामान्य माणसांच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. रेशनिंगपासून रोजगारापर्यंत सर्व स्तरावर सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला यांच्यावर अन्यायाचे धोरण सरकार राबविताना दिसत आहे.आंदोलनात महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वहिदा नायकवडी, राजश्री मालवणकर, नगरसेविका अश्विनी कांबळे, सुजाता हुद्दार, श्वेता शेठ, बेबी शेख, शमशाद नायकवडी, सुलोचना माने, रजिया अन्सारी आदी सहभागी झाल्या होत्या.डिस्ट्रॉय इन इंडिया : पृथ्वीराज पाटीलपृथ्वीराज पाटील म्हणाले की, या सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. व्यापार, उद्योग मंदीत गेला. नोटाबंदी, जीएसटीमुळे देशाचा आर्थिक विकास दर खालावला. या निर्णयाचा सामान्य नागरिकांना प्रचंड त्रास झाला. शासनाची ‘मेक इन इंडिया’ योजना फेल गेली असून, ती आता ‘डिस्ट्रॉय इन इंडिया’ अशी बनली आहे. गेल्या चार वर्षात सर्वच पातळीवर हे सरकार अपयशी ठरले आहे. सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. 

महिलांवरील अत्याचार वाढले : शैलजाभाभी पाटीलशैलजाभाभी पाटील म्हणाल्या की, देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना या सरकारच्या काळात वाढल्या आहेत. अत्याचार करणाºया नराधमांना अटक करून त्यांना शिक्षा करण्यासाठी सरकारचे कोणतेही प्रयत्न दिसत नाहीत. असे नराधम खुलेआम फिरत आहेत. त्यांना सरकारचे अभय मिळत असल्याचा संशय वाटत आहे. त्यामुळे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. महिलांप्रमाणेच समाजातील एकही घटक आज या भाजप सरकारच्या काळात सुखी दिसत नाही. त्यामुळे आम्ही अशा अपयशी सरकारचा निषेध करीत आहोत.

टॅग्स :Sangliसांगलीcongressकाँग्रेसMorchaमोर्चा