शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
2
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
3
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
4
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
6
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
7
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
8
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
9
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
10
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
11
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
12
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
13
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
14
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
15
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
16
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
17
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
18
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
19
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
20
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 

भगवान महावीर जन्मकल्याणकनिमित्त सांगलीत शोभायात्रा, विविध धार्मिक कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 4:08 PM

सत्य, अहिंसा, अपरिग्रह अशा मूल्यांचा संदेश देणारे जैन धर्मियांचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या २६१७ व्या जन्मकल्याणकनिमित्त सांगलीत गुरुवारी सकाळी भक्तीमय वातावरण व जय जिनेंद्रच्या जयघोषात शोभायात्रा काढण्यात आली. यानिमित्त जैन सोशल ग्रुपच्यावतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. शासकीय रुग्णालय, अनाथाश्रम व वृद्धाश्रमात अन्नदान व फळांचे वाटप करण्यात आले.

ठळक मुद्देभगवान महावीर जन्मकल्याणकनिमित्त सांगलीत शोभायात्रारक्तदान शिबिर : जैन मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात

सांगली :  सत्य, अहिंसा, अपरिग्रह अशा मूल्यांचा संदेश देणारे जैन धर्मियांचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या २६१७ व्या जन्मकल्याणकनिमित्त सांगलीत गुरुवारी सकाळी भक्तीमय वातावरण व जय जिनेंद्रच्या जयघोषात शोभायात्रा काढण्यात आली. यानिमित्त जैन सोशल ग्रुपच्यावतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. शासकीय रुग्णालय, अनाथाश्रम व वृद्धाश्रमात अन्नदान व फळांचे वाटप करण्यात आले.आमराईपासून शोभायात्रेस प्रारंभ झाला. शोभायात्रेत चित्ररथ, चांदीच्या रथात आकर्षक सजावटीने सजविलेली भगवान महावीर यांची प्रतिमा व पंचमेरू यांचा समावेश होता. दिगंबर, श्वेतांबरसह सर्व पंथाच्या धर्मियांनी शोभायात्रेत मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.

शेठ रा. ध. दावडा दिगंबर जैन बोर्डिंगच्या विद्यार्थ्यांनी फेटे बांधून व पांढरे पोशाख परिधान करून भगवान महावीर यांच्या घोषणा दिल्या. जैन महिलाश्रमच्या विद्यार्थिनीं, महिलांनीही फेटे बांधले होते. काननवाडी येथील झांजपथकासह नांद्रे येथील सत्यप्रेमी महिला झाजंपथक शोभा यात्रेचे आकर्षण ठरले.

पटेल चौक, गणपती मंदिर, टिळक चौक, कापडपेठ मार्गे वखार भागातील जैन मंदिराजवळ शोभायात्रेची सांगता झाली. या शोभायात्रेत खासदार संजयकाका पाटील, माजी खासदार प्रतिक पाटील, वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, माजी उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर, माजी नगरसेवक लक्ष्मण नवलाई, दक्षिण भारत जैन सभेचे उपाध्यक्ष रावसाहेब पाटील, एसटी महामंडळ इंटक काँग्रेसचे अध्यक्ष रावसाहेब माणकापुरे, शांतिनाथ नंदगावे, शांतिनाथ पाटील, प्रा. राहुल चौगुले, प्रमोद पाटील, जैन सोशल ग्रुपचे स्वप्नील शाह, सुशांत शाह, तेजपाल शहा. चंद्रकांत मालदे, सुभाष शहा, शरद शहा, कमल चौधरी, अनिता पाटील आदी सहभागी झाले होते. जैन मंदिरात सकाळपासून १०८ कलशांचा भगवान महावीर यांचा अभिषेक करण्यात आला. तसेच अष्टक पूजा आणि आरती करण्यात आदी कार्यक्रम झाले.

३५० जणांचे रक्तदानजैन सोशल ग्रुपच्यावतीने कच्छी जैन भवन येथे आयोजित रक्तदान शिबिरात ३५० हून अधिकजणांनी रक्तदान केले. या महिलांची संख्या लक्षणिय होती. यावेळी दीपा दोशी, अश्विनी शहा, प्रसन्ना शहा, सुशांत शहा, अनिल शहा, साहिल शहा, निलेश शहा, वैशाली शहा, समीर शहा, नितेश शहा, ऋतुजा शहा, शीतल उपाध्ये व जैन युवा फोरमचे सदस्य उपस्थित होते. सिद्धीविनायक रक्तपेढी व एनएसआय रक्तपेढीने सहकार्य केले.

टॅग्स :SangliसांगलीMahavir Jayanti 2018महावीर जयंती २०१८