धुळ्यात भगवान महावीर जयंतीनिमित्त काढण्यात आलेली मिरवणूक ठरली लक्षवेधक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 01:17 PM2018-03-29T13:17:06+5:302018-03-29T13:17:06+5:30

ढोलताशांचे पथक ठरले विशेष आकर्षण, समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी

The procession, which took place in Dhule for Lord Mahavir Jayanti | धुळ्यात भगवान महावीर जयंतीनिमित्त काढण्यात आलेली मिरवणूक ठरली लक्षवेधक

धुळ्यात भगवान महावीर जयंतीनिमित्त काढण्यात आलेली मिरवणूक ठरली लक्षवेधक

Next
ठळक मुद्देसकाळी ९ वाजता मिरवणुकीला सुरवातढोल-ताशांनी वेधले लक्षसमाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी

लोकमत आॅनलाईन
धुळे : भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त सकलजैन समाजातर्फे आज सकाळी शहराच्या विविध मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीने शहरवासियांचे लक्ष वेधले होते.
शहरातील गल्ली क्रमांक दोनमधील शीतलनाथ मंदिर संस्थानपासून मिरवणुकीला सकाळी ९ वाजता सुरुवात झाली. ही मिरवणूक जे. बी. रोड, जुना आग्रा रोड, महात्मा गांधी पुतळामार्गे, जुने धुळेमार्गे गिंदोडिया शाळेत मिरवणुकीचा समारोप झाला.मिरवणूक  मार्गावर अनेक ठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.  एका सजविलेल्या गाडीवर भगवान महावीर यांची प्रतिमा ठेवलेली होती. समाजातील  तरुणांनी डोक्यावर भगवा फेटा परिधान केला होता. त्यांनी  उत्कृष्ट ढोल, ताशांचे सादरीकरण करून  शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. मिरवणुकीत महिलांसह समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


 

 

Web Title: The procession, which took place in Dhule for Lord Mahavir Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे