भगवान महावीर स्वामींच्या जयघोषाने दुमदुमली जळगावनगरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 01:34 PM2018-03-29T13:34:40+5:302018-03-29T13:34:40+5:30

भव्य शोभायात्रेने फेडले डोळ््याचे पारणे

Lord Mahavir Swamy's jayanti program | भगवान महावीर स्वामींच्या जयघोषाने दुमदुमली जळगावनगरी

भगवान महावीर स्वामींच्या जयघोषाने दुमदुमली जळगावनगरी

Next
ठळक मुद्देजन्मकल्याणक महोत्सवाचा अपूर्व उत्साहप्रबोधनात्मक देखावे

आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २९ - शासनपती श्रमण भगवान महावीर स्वामी यांची २६१७वी जयंती शहरात विविध कार्यक्रमांनी गुरुवारी उत्साहात साजरी करण्यात आली. काँग्रेसभवन समोरील श्री वासुपूज्य जैन मंदिरापासून काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेने सर्वांच्या डोळ््यांचे पारणे फेडले. मिरवणुकीदरम्यान करण्यात आलेल्या भगवंतांच्या जयघोषाने शहर दुमदुमून निघाले. या शोभायात्रेने पाणी बचाव, देहदान, रक्तदान, बेटी बचाव असे विविध संदेश देत संस्कृतीचे दर्शन घडविले. महावीर जयंती निमित्त झालेल्या रक्तदान शिबिरासही भरघोस प्रतिसाद मिळाला. जैनम् जयती शासनम् जैन धर्म की शान है....अशा भक्तीगीतांनीही लक्ष वेधून घेतले.
शिस्तबद्ध मिरवणूक
भगवान महावीर स्वामी यांच्या २६१७व्या जन्मकल्याणक महोत्सवांतर्गत गुुरुवारी सकाळी साडेसात वाजता काँग्रेस भवनासमोरील श्री वासुपूज्य जैन मंदिरात संघपती दलुभाऊ जैन, समिती प्रमुख दिलीप गांधी, मनोज सुराणा, राजेश जैन, भागचंद जैन यांच्याहस्ते ध्वज वंदन करण्यात आले. त्यानंतर आठ वाजता महावीर स्वामींच्या सवाद्य मिरवणुकीस मंदिरापासून सुरुवात झाली.
सजविलेली बग्गी व चंदेरी रथातून महावीर स्वामींची प्रतिमा ठेवून अत्यंत शिस्तबद्ध निघालेल्या या मिरवणुकीत भगवंतांचा जयजयकार करीत महिला-पुरुषांनी भक्तीगीत सादर केले. नेत्रदीपक वरघोडा मिरवणूक तसेच पंचरंगी ध्वज सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
अडीच हाजारावर पांढरे शुभ्र कपडे परिधान केलेले पुरुष आणि लाल साड्या घातलेल्या महिला या मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. समाजबांधवांनी एकमेकांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा देत एकतेचे दर्शन घडविले. या मिरवणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य राहिले ते म्हणजे समाज प्रबोधन करणारे विविध देखावे मिरवणुकीत सहभागी झाले
होते. श्री वासुपूज्य जैन मंदिरापासून निघालेले ही मिरवणूक सुभाष चौक, सराफ बाजार, रथ चौक, चित्रा चौक मार्गे येऊन बालगंधर्व नाट्यगृहाजवळ मिरवणुकीचा समारोप
झाला. या मिरवणुकीत रथ, बग्गीसोबतच वाजंत्री, भजन रिक्षांचा सहभाग होता.

Web Title: Lord Mahavir Swamy's jayanti program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.