शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
2
Top Marathi News LIVE Updates: बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; पश्चिम बंगाल, तामिळनाडूतही मतदारराजा देणार कौल
3
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
6
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
7
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
8
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
9
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
10
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
11
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
12
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
13
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
14
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
15
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
16
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
17
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
18
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
19
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
20
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत १७ तळीरामांना अटक

By admin | Updated: December 23, 2014 00:34 IST

वाहने जप्त : नशेत वाहन चालविणे भोवले

सांगली : दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्या तळीरामांविरुद्ध पोलिसांनी पुन्हा एकदा मोहीम सुरु केली आहे. गेल्या तीन दिवसात सांगली, मिरजेत १७ तळीरामांना अटक करण्यात आली आहे. त्यांची वाहने जप्त केली आहेत. ही मोहीम आणखी तीव्र करणार असल्याचे जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी सांगितले.अटक केलेल्यांमध्ये विनोद दत्तात्रय वाघमारे (वय ३१) संजय नागनाथ आपाते (२८, दोघे रा. वारणाली, विश्रामबाग), रामचंद्र आबा गडदे (५१, कुपवाड), यशवंत विष्णू कदम (३०, शामरावनगर, सांगली), सुखदेव वसगाप्पा कांबळे (३५, हनुमाननगर, सांगली), सोमेश सुशील लोखंडे (१९, वानलेसवाडी), महादेव रामचंद्र वाघमोडे (४३, मिरज), लकाप्पा सोमराव हिंगनवार (४०, नांगराळे, ता. चिक्कोडी), सुशीलकुमार धोंडीराम फडतरे (४०, घालवाड, ता. शिरोळ), अब्दुल ईलाई मुल्ला (४३, खिद्रापूर, ता. शिरोळ), संजय बाळासाहेब कदम (४४, विजयनगर, सांगली), नंदकुमार श्रीकांत देवरादर (३४, भारतनगर, मिरज), काडाप्पा रामाप्पा गस्ते (३८, माळी चित्रमंदिरजवळ, सांगली), हर्षद हंबीरराव पाटील (२३, पेठ, ता. वाळवा), कुमार वसंत बनसोडे (३३, इंदिरानगर झोपडपट्टी, सांगली), कृष्णा गुराप्पा चौगुले (३२, डी मार्टमागे, शंभरफुटी रस्ता, सांगली) व रविराज पांडुरंग कुदळे (३१, पाकीजा मशिदीसमोर, शंभरफुटी, सांगली) यांचा समावेश आहे.दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्या तळीरामांना पकडण्यासाठी सांगली व मिरज वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे १९ डिसेंबरपासून मोहीम उघडण्यात आली आहे. २१ डिसेंबरपर्यंत १७ तळीराम सापडले आहेत. ही कारवाई दररोज सुरु ठेवली जाणार असल्याचे पोलीसप्रमुख सावंत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)