शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

५० हजार गुंतवा, ६० हजार मिळवा; शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची 'दस हजारी' योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2019 4:44 PM

येत्या काही दिवसात नोकरदार माणसाला मिळणाऱ्या पगाराप्रमाणे शेतकऱ्याला पगार सुरू करण्याची योजना विचारात असल्याचे  प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. वाळवा येथे दोन विकासकामांचे लोकार्पण आणि दोन कामांचे भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. 

ठळक मुद्देशेतकऱ्याच्या पत्नीच्या खात्यावर दरमहा रक्कम देणार  अटल पेन्शन योजनेतून शेतकऱ्यांचा हप्ता भरणार वाळवा येथे विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण

सांगली : येत्या काही दिवसात नोकरदार माणसाला मिळणाऱ्या पगाराप्रमाणे शेतकऱ्याला पगार सुरू करण्याची योजना विचारात असल्याचे  प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. वाळवा येथे दोन विकासकामांचे लोकार्पण आणि दोन कामांचे भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. हे शासन महाराष्ट्रातील सामान्य माणूस, शेतकऱ्यांचे आहे. शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना आधार दिला आहे, असे  चंद्रकांत पाटील म्हणाले.

शेतीमाल विकल्यानंतर साधारणतः ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात शेतकऱ्याने शासनाकडे 10 हजार, 20 हजार ते जास्तीत जास्त 50 हजार रुपये ठेवायचे. त्यानंतर रकमेनुसार दर महिन्याच्या 5 तारखेला शेतकऱ्याच्या पत्नीच्या खात्यावर आरटीजीएसने ठराविक रक्कम जमा होईल. यामध्ये जर शेतकऱ्याने 30 हजार रुपये ठेवले तर दर महिन्याच्या 5 तारखेला पत्नीच्या खात्यावर आरटीजीएसने 3 हजार रुपयेप्रमाणे वर्षाला 36 हजार रुपये जमा होणार.शेतकऱ्याने 50 हजार रुपये भरले तर प्रतिमाह 5 हजार रुपये प्रमाणे वर्षाचे 60 हजार रुपये पत्नीच्या खात्यावर जमा होणार. यामध्ये भरलेल्या रकमेपेक्षा 10 हजार रुपये जास्त त्यांना मिळणार आहेत. अशा प्रकारची योजना सुरू करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.

केंद्र शासनाने अटल पेन्शन योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांचा हप्ता भरण्याबाबत राज्य शासन विचार करत असल्याचे सांगून  चंद्रकांत पाटील म्हणाले, अटल पेन्शन योजनेतून 18 वर्षांच्या तरूण शेतकऱ्याने दरमहा 210 रुपये भरायचे. या रकमेचे 60 वर्षांपर्यंत 1 लाख 3 हजार रुपये होतात. 60 वर्षांनंतर त्याला दरमहा 5 हजार रुपये निवृत्तीवेतन, संबंधित शेतकऱ्याचा मृत्यु झाल्यानंतर त्याच्या पत्नीलाही दरमहा 5 हजार रुपये, तर दोघांच्या मृत्युनंतर मुलाला साडेआठ लाख रुपये एकरकमी मिळण्याबाबत अटल पेन्शन योजना आहे. या योजनेतून राज्यातील जवळपास एक कोटी शेतकऱ्यांच्या हप्ता भरण्याबाबत राज्य शासन विचार करत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी कृषि व फलोत्पादन पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार शिवाजीराव नाईक, जिल्हाधिकारी वि. ना. काळम, जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समिती सभापती डॉ. सुषमा नायकवडी, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशीकांत पाटील, हुतात्मा शिक्षण व उद्योग समुहाचे मार्गदर्शक वैभव नायकवडी, हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष गौरव नायकवडी, उपविभागीय अधिकारी नागेश पाटील, तहसिलदार रविंद्र सबनीस, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डॉ. एस. आर. काटकर, सरपंच डॉ. शुभांगी माळी, नगरसेवक विक्रम पाटील, वैभव शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते.

नागनाथअण्णा नायकवडींच्या स्मारकासाठी 10 कोटी रुपये तरतूदनागनाथअण्णा नायकवडींच्या स्मारकासाठी 10 कोटी रुपये तरतूद राज्य शासनाने केली असल्याचे सांगून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या साडेचार वर्षात देशाचे संपूर्ण स्वरूप बदलले आहे. शेतकरी, सामान्य माणूस सुखी होण्यासाठी शासन कार्यरत आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सामान्य माणसाच्या घराचे स्वप्न सत्यात येत आहे, प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत मोफत गॅस जोडणी महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यात आली. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतून गर्भवती महिलेच्या आरोग्याची काळजी, अपूर्ण सिंचन योजनांच्या पूर्ततेसाठी भरीव निधी, स्वच्छ महाराष्ट्र अभियानातून शौचालय बांधणी, सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प, एफआरपी देणे बंधनकारक केले.

आयुष्यमान भारत योजनेंतर्गत आर्थिक दुर्बल घटकाला वर्षाला 5 लाख रुपयांचा मोफत उपचार देण्यात येत आहे. एकूणच घर, शौचालय, गॅस, आजारपणात मोफत औषधोपचार, रस्ते, सिंचन योजनांचा 81 टक्के वीजबिल शासन भरणार अशा अनेक बाबींतून शासन सामान्य माणूस सुखी होण्यासाठी प्रयत्न करत आहे. राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, वाळवा तालुक्यात छोट्या छोट्या गावातही रस्त्यांचे जाळे विणले आहे. लहान-मोठ्या गावच्या अनेक पाणीयोजना पूर्ण केल्या आहेत. अहिरवाडी येथे निर्यात सुविधा केंद्रासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे शेतमालाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्याला जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न आहे.वाळवा येथील विकासकामांचे लोकार्पण सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यामध्ये हुतात्मा चौक ते कोट भाग चावडीपर्यंतचा गावांतर्गतचा रस्ता डांबरीकरणाचे काम पूर्ण असून त्यासाठी 30 लाख रुपये निधी खर्चण्यात आला आहे. वाळवा तालुक्यातील आठवडी बाजार विकसित करण्यासाठी 30 लाख रुपये निधी खर्चण्यात आला आहे. यामध्ये आठवडी बाजारातील बाजार कट्टे, पेव्हींग ब्लॉक, मटण मार्केट या कामांचा समावेश आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील पुसेसावळी - वांगी - नागठाणे - वाळवा - बोरगाव - कासेगाव - वाटेगाव - टाकवे (राज्य मार्ग 158) अंतर्गत वाळवा - बोरगाव ते बहे पूल या कामाचे मजबूतीकरण कामाचा शुभारंभ सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आला.

या कामासाठी 7 कोटी रूपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण तसेच पाच गाळ्याचा उंच पातळीचा लहान पूल बांधणे या कामाचा समावेश आहे. तसेच, हुतात्मा चौक वाळवा ते अहिरवाडीकडे जाणारा रस्ता डांबरीकरणासाठी 20 लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. या कामाचाही शुभारंभ यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी आमदार शिवाजीराव नाईक, नगराध्यक्ष निशिकांत पाटील व वैभव नायकवडी यांनी मनोगत व्यक्त करताना गेल्या साडेचार वर्षात केलेल्या विकासकामांबद्दल माहिती दिली. स्वागत व प्रास्ताविक गौरव नायकवडी यांनी केले. सूत्रसंचालन बजरंग गावडे व के.व्ही. पाटील यांनी केले. आभार सरपंच डॉ. शुभांगी माळी यांनी मानले. या कार्यक्रमास वाळवा ग्रामपंचायतीचे सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Chandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलSangliसांगलीFarmerशेतकरी