एस. के. पाटील निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:32 IST2021-08-18T04:32:22+5:302021-08-18T04:32:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पलूस : पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष शंकरराव केशवराव पाटील (वय ९५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ...

S. K. Patil passed away | एस. के. पाटील निधन

एस. के. पाटील निधन

लोकमत न्यूज नेटवर्क

पलूस : पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष शंकरराव केशवराव पाटील (वय ९५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते परिसरात एस. के. पाटील काका या नावाने परिचित होते.

काकांचा जन्म १५ जुलै १९२८ रोजी पलूस येथील सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. १९४८ मध्ये किर्लोस्कर कारखान्यात नोकरी पत्करली. ते लगेचच १९४९ मध्ये कामगार युनियनचे सचिव म्हणून कार्यरत झाले. पण सामाजिक कार्याची आवड आणि परिसरातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची त्यांची तळमळ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणून सहकऱ्यांच्या मदतीने दि. ८ जून १९५८ रोजी विकास विद्यामंदिरची स्थापना केली. आत्ताचे लक्ष्मणराव विद्यामंदिराची १९६० मध्ये स्थापना झाली. या विद्यामंदिरने परिसरात मिळवलेले यश आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे काळाची गरज म्हणून १९७५ मध्ये उच्च माध्यमिक, तर १९९२ मध्ये महाविद्यालयाची स्थापना केली.

पलूस औद्योगिक वसाहत सहकारी सोसायटी आणि इंडस्ट्रीयल को-ऑफ ऑर्गनायझेशनचे काकांनी अध्यक्षपद भूषविले आहे. त्यांच्या कामावरील तळमळीने पलूस परिसरातील उद्योग, व्यापार, सहकार शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व अशी ख्याती होती. त्यांच्या निधनाने पलूस परिसरावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, पाच मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या इमारतीत पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले होते. मंगळवारी पलूस येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

170821\1717-img-20210817-wa0006.jpg

निधन वार्ता

Web Title: S. K. Patil passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.