शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

खासगी इंग्रजी शाळांचे आरटीई बहिष्कार आंदोलन, शिक्षणमंत्र्यांच्या जिल्ह्यातून आंदोलनाला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 15:44 IST

आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी हे आंदोलन

सांगली : कोरोनापूर्वीची आरटीई विद्यार्थीसंख्या गृहीत धरुन प्रवेश प्रक्रिया सुरु करण्याची मागणी मेस्टा (महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन) संघटनेने केली आहे. त्यासाठी आरटीई बहिष्कार आंदोलन सुरु केले आहे. आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी हे आंदोलन असल्याचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजयराव तावडे यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.२०१९ मधील विद्यार्थीसंख्या गृहीत धरुन नवीन आरटीई प्रवेश निश्चित करणार असल्याचे शासनाने परिपत्रकात म्हटले आहे. डॉ. तावडे म्हणाले की, याविरोधात आंदोलनाचे स्वरूप व दिशा ठरविण्यासाठी बुधवारी (दि. १६) मुंबईत राज्य कार्यकारिणीची बैठक होणार आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हिंगोली जिल्ह्यातून आरटीई बहिष्कार आंदोलन सुरु केले आहे.मेस्टाच्या मागण्या अशा : कोरोनापूर्वीच्या विद्यार्थी संख्येच्या आधारे आरटीईचे २५ टक्के राखीव प्रवेश निश्चित करावेत. २०२१-२२ या वर्षातील २५१८ राखीव विद्यार्थ्यांच्या शुल्क परतावा कपातीचे परिपत्रक रद्द करावे. रिक्त जागा भरण्यासाठी परवानगी मिळावी.सर्व खासगी शाळांची न्यायालयीन प्रकरणे निकाली काढावीत. इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांना शासनाने प्रशिक्षण व राज्य विमा निगमचे फायदे द्यावेत. शाळांचा मालमत्ता कर रद्द करावा. आरटीई मधून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके व शालेय साहित्य द्यावे.बैठकीला मेस्टाचे सांगली जिल्हाध्यक्ष मोहन माळी, जिल्हा सरचिटणीस उत्तम पाटील, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख शंकरराव चव्हाण आदी उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती आशा पाटील यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.शाळांना संरक्षण द्यावेशाळांसाठी संरक्षण कायदा करावा. दर्जावाढ व नैसर्गिक वाढीचे अधिकार स्थानिक प्रशासन किंवा शिक्षण उपसंचालकांना द्यावेत. शाळांच्या प्रतिनिधींना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावेत.

टॅग्स :SangliसांगलीEducationशिक्षणSchoolशाळा