खोतवाडी येथे भुस्खलनमुळे रस्ता बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:28 IST2021-07-28T04:28:28+5:302021-07-28T04:28:28+5:30

कोकरुड : खोतवाडी (सोनवडे, ता. शिराळा) येथील जिल्हा परिषद शाळेसमोर भुस्खलन होऊन दगड-माती वाहून आल्याने रस्ता बंद झाला आहे. ...

Road closed due to landslide at Khotwadi | खोतवाडी येथे भुस्खलनमुळे रस्ता बंद

खोतवाडी येथे भुस्खलनमुळे रस्ता बंद

कोकरुड : खोतवाडी (सोनवडे, ता. शिराळा) येथील जिल्हा परिषद शाळेसमोर भुस्खलन होऊन दगड-माती वाहून आल्याने रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे घरांना धोका निर्माण झाला असून, प्रशासनाने याची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शंकर मोहिते यांनी केली आहे.

सोनवडे पैकी खोतवाडी ही वस्ती डोंगराला लागून वसली आहे. येथील जिल्हा परिषद वाडीच्या वरच्या बाजूला १ ते ४ पर्यंत आहे. मात्र चार दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने डोंगरात चार ठिकाणी भुस्खलन होऊन दगड-माती खोतवाडीच्या दिशेने वाहून आली. दगड माती शाळेच्या दारात येऊन धडकली आहे. त्याचा वाडीतील अनेक घरांना फटका बसला असून, घरातील दगडी, मार्बल फरशी उखडून पडली आहे. काही भिंती खचल्या आहेत. पाऊस कमी होऊनही प्रशासनाने अजून वाहून आलेली दगड, माती काढलेली नाही. एकही अधिकारी फिरला नसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून, त्याची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी मोहिते यांनी केली आहे.

Web Title: Road closed due to landslide at Khotwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.