मिरजेमध्ये रिव्हॉल्व्हर जप्त; सावर्डेतील एकास अटक-सांगली-मिरज रस्त्यावर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 13:14 IST2019-04-19T13:13:36+5:302019-04-19T13:14:35+5:30
रिव्हॉल्व्हर बाळगून दहशत माजविण्याचा प्रयत्न करणाºया दीपक विष्णू सदाकळे (वय ३४, रा. सावर्डे, ता. तासगाव) यास अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून रिव्हॉल्व्हर व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सांगली-मिरज रस्त्यावरील क्रीडा संकुलजवळ बुधवारी रात्री ही कारवाई केली.

मिरजेमध्ये रिव्हॉल्व्हर जप्त; सावर्डेतील एकास अटक-सांगली-मिरज रस्त्यावर कारवाई
सांगली : रिव्हॉल्व्हर बाळगून दहशत माजविण्याचा प्रयत्न करणाºया दीपक विष्णू सदाकळे (वय ३४, रा. सावर्डे, ता. तासगाव) यास अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून रिव्हॉल्व्हर व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सांगली-मिरज रस्त्यावरील क्रीडा संकुलजवळ बुधवारी रात्री ही कारवाई केली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदा हत्यार बाळगणाºयांचा शोध घेतला जात आहे. आतापर्यंत ‘अर्धा’ डझनवर पिस्तुली जप्त केल्या आहेत. दीपक सदाकळे हा क्रीडा संकुलजवळ कमरेला रिव्हॉल्व्हर लाऊन संशयितरित्या फिरत होता. रिव्हॉल्व्हरच्या धाकाने तो दहशत माजविण्याचा प्रयत्न करीत आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील पोलीस हवालदार बिरोबा नरळे यांना मिळाली.
नरळे यांनी पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदाकळे यास ताब्यात घेतले. अंगझडती घेतल्यानंतर त्याच्याकडे रिव्हॉल्व्हर व दोन काडतुसे सापडली. त्याच्याविरुद्ध मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात बेकायदा हत्यार बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे रिव्हॉल्व्हर त्याने कोठून आणले होते? तो का बाळगत होता, याबद्दल चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.