शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत निवृत्त कर्मचाऱ्यांचा रेल रोकोचा प्रयत्न, आंदोलक-पोलिसांमध्ये झटापट

By शरद जाधव | Updated: December 20, 2023 17:52 IST

मिरज : विविध मागण्यांसाठी निवृत्त कर्मचाऱ्यांनी मिरज रेल्वे स्थानकाबाहेर आंदोलन केले. आंदोलकांनी रेल्वे स्थानकात घुसून रेल्वे रोखण्याचा प्रयत्न केल्याने ...

मिरज : विविध मागण्यांसाठी निवृत्त कर्मचाऱ्यांनी मिरजरेल्वे स्थानकाबाहेर आंदोलन केले. आंदोलकांनी रेल्वे स्थानकात घुसून रेल्वे रोखण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी त्यांना अडवले. यावेळी पोलिस व आंदोलकात जोरदार झटपट झाली.ईपीएफ पेन्शनर संघाची अखिल भारतीय समन्वय समिती, सर्व श्रमिक संघटनेतर्फे केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले. आंदोलनात सांगली, सातारा व कोल्हापुरातील विविध विभागातील निवृत्त कर्मचारी सहभागी होते. देशभरात ७५ लाख निवृत्ती वेतनधारकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. केंद्र सरकारचे धोरण निवृत्ती वेतनधारकांच्या विरोधात आहे. भविष्य निर्वाह निधीतही पेन्शनरांची फसवणूक होत असल्याचा निवृत्त कर्मचाऱ्यांचा आरोप आहे. पेन्शन फंडावर मिळणाऱ्या व्याजापैकी केवळ २५ टक्के रक्कम पेन्शनरना दिली जात आहे. शंभर टक्के रक्कम दिल्यास प्रत्येक पेन्शनरला दरमहा ५८०० रुपये पेन्शन मिळेल, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. किमान नऊ हजार रुपये पेन्शन, महागाई भत्ता, प्रवासात सवलत, स्वस्त राशन, मोफत आरोग्य सुविधा मिळाव्यात, केंद्र सरकारचा २०१४ चा ठराव रद्द करावा, पेन्शन हिशेबाची पद्धत बदलावी, ११/४ कलम रद्द करून पूर्ण वेतनावर पेन्शन मिळावी. पेन्शन फंडाचे खासगीकरण थांबवावे. पेन्शन योजनेवर श्वेतपत्रिका जारी करावी, या प्रमुख मागण्यांसाठी मिरज रेल्वे स्थानकात रेल रोको आंदोलन जाहीर करण्यात आले होते.मिरजेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चा काढला. मिरज रेल्वे स्थानकात ठिय्या आंदोलन व निदर्शने करण्यात आली. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त होता. यावेळी आंदोलकांनी रेल्वे स्थानकात घुसून मैसूर - अजमेर रेल्वे रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांना अडवल्याने आंदोलक पोलिसांची जोरदार झटापट झाली. पोलिसांनी आंदोलकांना रेल रोको करू दिला नाही. आंदोलकांनी जोरदार घोषणा देत रेल्वे स्थानक दणाणून सोडले.

आंदोलनात गोपाळ पाटील, भाऊसाहेब यादव, अशोक कदम, तुकाराम पाटील, महादेव देशमुख, दीपक कांबळे, अतुल दिघे, अनंत कुलकर्णी, प्रकाश जाधव, नाना जगताप, रवी साळुंखे, शंकर पाटील यांच्यासह एसटी, सहकारी बँका, सहकारी सूतगिरणी, सहकारी साखर कारखान्यासह विविध विभागातील निवृत्त कर्मचारी सहभागी होते. 

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजrailwayरेल्वेagitationआंदोलनPoliceपोलिस