शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

जतमध्ये विलासराव जगतापांना पुन्हा धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2015 00:34 IST

काँग्रेसचे वर्चस्व कायम : विक्रम सावंत, सुरेश शिंदे समर्थकांचा पराभव

जत : सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणुकीत वसंतदादा रयत पॅनेलचे सातपैकी पाच उमेदवार विजयी झाले आहेत. या निकालाने पुन्हा एकदा भाजपचे आमदार विलासराव जगताप यांना धक्का बसला. विजयी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी जत शहरातील प्रमुख चौकात फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला. रयत पॅनेलमधील सोसायटी गटातील उमेदवार मच्छिंद्र वाघमोडे व रवींद्र सावंत यांना अनपेक्षितपणे पराभवाला सामोरे जावे लागले. वाघमोडे यांच्या उमेदवारीसाठी बाजार समितीचे माजी सभापती सुरेश शिंदे यांनी जोरदार प्रयत्न केले होते. रवींद्र सावंत हे जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे संचालक विक्रम सावंत यांचे समर्थक आहेत. वाघमोडे यांच्या पराभवामुळे सुरेश शिंदे यांना, तर रवींद्र सावंत यांच्या पराभवामुळे विक्रम सावंत यांना धक्का बसला आहे. बाजार समिती निवडणुकीत शेतकरी विकास पॅनेलचे सहा उमेदवार होते. या सहापैकी एकही उमेदवार विजयी झाला नाही. त्यामुळे आ. विलासराव जगताप यांच्या राजकारणाला हा एक धक्काच मानला जात आहे. रयत पॅनेलमधील सर्वच सात उमेदवारांना जत तालुक्यातून मताधिक्य मिळाले आहे, तर शेतकरी विकास पॅनेलच्या उमेदवारांना मताधिक्य मिळविता आले नाही. त्यामुळे तालुक्यातील भाजप कार्यकर्ते आणि नेतेमंडळींवर आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँक निवडणूक, जत नगरपालिका नगराध्यक्ष पदाची निवडणूक, तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका व आता झालेली बाजार समितीची निवडणूक, या सर्व ठिकाणी आ. विलासराव जगताप यांना पराभवास सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे यापुढील काळात तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहेत. माजी समाजकल्याण समिती सभापती आकाराम मासाळ यांची मदत घेऊन सुरेश शिंदे व विक्रम सावंत यांनी बाजार समितीची सत्ता हस्तगत केली आहे. बाजार समितीच्या निवडणूक निकालावरून तालुक्यातील कॉँग्रेस एकसंध आहे, हे स्पष्ट झाले आहे. (वार्ताहर)‘जनसुराज्य’ची बाजीजत तालुक्यात जनसुराज्य शक्ती पक्षाचे अस्तित्व संपले आहे, असा आरोप आमदार विलासराव जगताप व बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे यांनी निवडणूक प्रचारादरम्यान केला होता. परंतु रयत पॅनेलमधील जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार देवगोंडा बिराजदार (पाटील) हे विजयी झाले आहेत. त्यामुळे माजी जि. प. उपाध्यक्ष बसवराज पाटील यांनी पक्षाचे अस्तित्व असल्याचे दाखवून दिले आहे.