वसगडे येथील महिला ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 22:03 IST2019-01-25T22:02:06+5:302019-01-25T22:03:47+5:30
वसगडे (ता. पलूस) ग्रामपंचायतीतर्फे आयोजित महिला ग्रामसभेमध्ये दारुबंदीचा ठराव एकमताने झाला. सरपंच श्रेणिक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात सभा झाली. ग्रामसभेच्या प्रारंभीच कायमस्वरूपी दारुबंदी

वसगडे येथील महिला ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव
भिलवडी : वसगडे (ता. पलूस) ग्रामपंचायतीतर्फे आयोजित महिला ग्रामसभेमध्ये दारुबंदीचा ठराव एकमताने झाला. सरपंच श्रेणिक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात सभा झाली. ग्रामसभेच्या प्रारंभीच कायमस्वरूपी दारुबंदी करण्याविषयी गावातील महिलांनी दिलेल्या निवेदनाचे वाचन करण्यात आले. ग्रामसेविका स्वप्नगंधा बाबर यांनी प्रास्ताविक केले.उपसरपंच संपत पवार, लियाकत लांडगे, संजय पवार, दत्तात्रय माने, सदस्या शोभा पवार, आक्का कोळी, कमल कटापुरे, वंदना पवार, विजया पाटील आदींसह महिला उपस्थित होत्या. ग्रामसभेत बचत गट, गावाचा पाणीप्रश्न या विषयावरही चर्चा झाली.सरपंच श्रेणिक पाटील यांनी महिला ग्रामसभेने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करुन, गावातील सर्वांच्या सहकार्याने दारूबंदी करु असे सांगितले.अमोल पाटील गट दारुबंदीसाठी व युवा वर्गाच्या भल्यासाठी ग्रामपंचायतीबरोबर असल्याचे मत ग्रामपंचायत सदस्य लियाकत लांडगे यांनी जाहीर केले.
दुसरा प्रयत्न यशस्वी होणार
यापूर्वी दारुबंदीसाठी केलेला प्रयत्न अयशस्वी झाला होता; पण आता कोणत्याही परिस्थितीत हा लढा थांबवायचा नाही. आर या पारची अंतिम लढाई करण्याचा महिलांनी निर्धार केला आहे.