शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना उपचारांसाठी रुग्णालये आरक्षित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढतो आहे. वेळेत उपचार व्हावेत यासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढतो आहे. वेळेत उपचार व्हावेत यासाठी प्रशासनाने नियोजन करावे. तालुकास्तरावर उपचारांची सोय वाढविण्यासह आता आणखी रुग्णालये आरक्षित करून ठेवावीत, अशी सूचना पालकमंत्री जयंत पाटील यांनी शनिवारी सांगलीत केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, आयुक्त नितीन कापडणीस यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री पाटील म्हणाले, जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यांच्या उपचारांस प्राधान्य देण्यात येत असले तरी अडचणी वाढत आहेत. प्रशासनाने उपाययोजनांवर भर देतानाच सर्व बाधितांना उपचार मिळेल याचे नियोजन केल्यास सुलभता येणार आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सुरू असलेल्या कडक निर्बंधांचे पालन काटेकोरपणे करण्यास प्राधान्य द्यावे. जेणेकरून बाधितांची संख्या घटण्यास मदत होणार आहे. कोविड रुग्णालयासह तालुका स्तरावरही आता उपचारांची सोय करण्यात आली असून, ऑक्सिजन आणि रेमडेसिविरचा अनावश्यक वापर टाळावा. सध्या कोरोना रुग्णांवर उपचारांसाठी आरक्षित केलेल्या रुग्णालयांच्या संख्येतही वाढ केल्यास अजून दिलासा मिळणार असल्याने आता प्रशासनाने अजूनही काही रुग्णालये आरक्षित करावीत. रुग्णांची संख्या, उपलब्ध खाटांची संख्या याबाबतची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी यंत्रणेने काम केल्यास संभ्रमावस्था दूर होणार असल्याने माहिती पोहोचवावी, असेही त्यांनी सांगितले.

चौकट

लसीकरण केंद्रावरील गर्दी कमी करा : विश्वजित कदम

कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम मुंबईतून ऑनलाईन पद्धतीने बैठकीस उपस्थित होते. ते म्हणाले की, लसीकरण केंद्रावरील गर्दी कमी केल्यास संसर्गाचा धोका कमी होणार आहे. नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर नोंदणी केल्यास त्यांना संपर्क साधून लसीकरणासाठी बोलाविण्यात येईल, यासाठी नियोजन करावे.