शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

प्रधानमंत्री सुरक्षा व जीवन ज्योती विमा योजनेचे नुतनिकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 7:31 PM

सुरक्षा विमा योजना ही अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व यासाठी रुपये 2 लाखांचे विमा संरक्षण देणारी योजना असून वय वर्षे 18 ते 70 या वयोगटातील व्यक्ती यामध्ये सहभाग घेऊ शकतात. या योजनेचा वार्षीक हप्ता रु 12/- फक्त इतका आहे. जीवन ज्योती विमा योजना ही नैसर्गिक अथवा अपघाती मृत्यू झाल्यास रुपये 2 लाखांचे विमा संरक्षण देणारी योजना असून वय वर्षे 18 ते 50 या वयोगटातील व्यक्ती यामध्ये सहभाग घेऊ शकतात.

ठळक मुद्देलिंक केलेल्या बचत खात्यावर 30 मे पर्यंत पुरेशी रक्कम जमा करा-- जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली: प्रधानमंत्री सुरक्षा योजना व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना सर्वांसाठी सुरु करण्यात आल्या आहेत. या योजना बँका व पोस्ट ऑफिसमार्फत गरीब व वंचित घटकांसाठी प्राधान्याने राबविल्या जात आहेत. या योजनांचे 31 मे 2020 रोजी नुतनिकरण होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, सांगली जिल्ह्यामध्ये कार्यरत सर्व बँकांच्या व पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून 5 लाख 41 हजार ग्राहकांनी सुरक्षा विमा योजनेत तर 2 लाख 39 हजार ग्रहाकांनी जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत सहभाग नोंदविला आहे. जिल्ह्याची लोकसंख्या पाहता हे प्रमाण कमी आहे. यासाठी या विमा योजनांमध्ये यापुर्वी पासून सहभाग झालेल्यांच्या खात्यातून 31 मे 2020 रोजी विमा हप्ता नावे टाकण्यात येणार आहे.

ज्यांच्या खात्यांवर पुरेशी रक्कम असणार नाही, ते योजनेतून बाहेर पडतील व त्यांना या योजनांचा लाभ मिळणार नाही. यासाठी सर्वांनी आपल्या लिंक केलेल्या बचत खात्यावर दिनांक 30 मे पर्यंत पुरेशी रक्कम जमा करावी. तसेच जे पात्र व्यक्ती या योजनेत सामील झाले नाहीत, त्यांनी सामील होऊन या योजनांचा लाभ घ्यावा. त्यासाठी आपले खाते असलेल्या बँकेत अथवा पोस्ट ऑफिसमध्ये संपर्क करावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

सुरक्षा विमा योजना ही अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व यासाठी रुपये 2 लाखांचे विमा संरक्षण देणारी योजना असून वय वर्षे 18 ते 70 या वयोगटातील व्यक्ती यामध्ये सहभाग घेऊ शकतात. या योजनेचा वार्षीक हप्ता रु 12/- फक्त इतका आहे. जीवन ज्योती विमा योजना ही नैसर्गिक अथवा अपघाती मृत्यू झाल्यास रुपये 2 लाखांचे विमा संरक्षण देणारी योजना असून वयवर्षे 18 ते 50 या वयोगटातील व्यक्ती यामध्ये सहभाग घेऊ शकतात. या योजनेचा वार्षिक हप्ता 330/- फक्त इतका आहे. या योजनांतर्गत सहभाग घेण्यासाठी एक पानी साधा फॉर्म भरुन आपल्या खाते असणाऱ्या बँकेत/पोस्टात द्यावयाचा आहे. बँक/पोस्ट ऑफिस आपल्या खात्यातून ऑटो डेबिट पध्दतीने विमा हप्ता कपात करुन विमा कंपनीला पाठवते. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली आहे.

टॅग्स :LIC - Life Insurance Corporationएलआयसीbankबँक