कसबे डिग्रजमध्ये सेवानिवृत्त जवानांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:29 AM2021-09-27T04:29:22+5:302021-09-27T04:29:22+5:30

फोटो ओळ : कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे सेवानिवृत्त जवान किरण जाधव आणि फिरोज मकानदार यांचा सत्कार करण्यात आला. ...

Reception of Retired Soldiers in Kasbe Digraj | कसबे डिग्रजमध्ये सेवानिवृत्त जवानांचा सत्कार

कसबे डिग्रजमध्ये सेवानिवृत्त जवानांचा सत्कार

Next

फोटो ओळ : कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे सेवानिवृत्त जवान किरण जाधव आणि फिरोज मकानदार यांचा सत्कार करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्क

कसबे डिग्रज : कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे सुभेदार किरण जाधव आणि फिरोज मकानदार यांचा संरक्षण दलातील सेवानिवृत्तीबद्दल माजी सैनिक फौंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. कसबे डिग्रज सोसायटी, जीवन पाणी संस्था, सहकार पाणी पुरवठा संस्था, विविध मंडळे व्यक्ती यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

देशाच्या सीमा रक्षणासाठी जवान अखंडित कार्यरत असतात. देशासाठी त्यांच्या योगदान महान आहे. सेवानिवृत्तीनंतर जवानांनी गावच्या विकासासाठी मार्गदर्शन करावे, असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.

यावेळी सोसायटी अध्यक्ष रमेश काशीद, माजी सरपंच संतोष पिंपळे, जीवन संस्था अध्यक्ष रंगराव मोरे, आप्पासाहेब जाधव, कृष्णा पाटील आदींसह जाधव व मकानदार परिवार उपस्थित होते.

260921\20210917_194038.jpg

कसबे डिग्रजमधील सेवानिवृत्त सुभेदार किरण जाधव व फिरोज मकानदार यांचा सत्कार करण्यात आला

Web Title: Reception of Retired Soldiers in Kasbe Digraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app