शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: एमडी ड्रग्जसाठी वापरलेला कच्चा माल जप्त, तिघांच्या पोलिस कोठडीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 15:44 IST

सांगली : कार्वे (ता. खानापूर) येथील एमडी ड्रग्ज प्रकरणाचा खोलवर तपास सुरू आहे. संशयितांनी वापरलेला कच्चा माल जप्त केला ...

सांगली : कार्वे (ता. खानापूर) येथील एमडी ड्रग्ज प्रकरणाचा खोलवर तपास सुरू आहे. संशयितांनी वापरलेला कच्चा माल जप्त केला आहे. हा कच्चा माल मोठ्या प्रमाणात कोठून आणला याची चौकशी सुरू आहे. ऑनलाइन साहित्य मागवल्याचेही स्पष्ट झाले आहे. याचा तपास सुरू असून आणखी काही नावे निष्पन्न होण्याची शक्यता असल्याचे पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगितले. दरम्यान ड्रग्ज प्रकरणात अटक केलेल्या जितेंद्र परमार, अब्दुल रजाक शेख, सरदार पाटील या तिघांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.एमडी ड्रग्जच्या तपासाबाबत अधीक्षक घुगे म्हणाले, ड्रग्ज प्रकरणात सहा जणांसह कारखान्यास जागा देणाऱ्या महिलेस अटक केली आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या कोणत्याही आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला जाणार नाही. तपासात कोणाचा हस्तक्षेप चालू देणार नाही. स्थानिक गुन्हे अन्वेषणकडून व्यवस्थित तपास सुरू आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने तपास केला जात आहे.एमडी ड्रग्जसाठी आरोपींनी कच्चा माल मोठ्या प्रमाणात आणला होता. तो कोठून आणण्यात आला, याची चौकशी सुरू आहे, तसेच काही ऑनलाइन साहित्यही मागवले होते. या सर्वांचा तपास सुरू आहे. एमडी ड्रग्ज बनवताना पहिल्या बॅचमध्ये अपयश आले होते. संशयितांनी कच्चा माल आणि पहिल्या प्रयत्नात बनवलेले एमडी ड्रग्ज नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. हा माल जप्त करण्यात आला आहे.दरम्यान ड्रग्ज प्रकरणात अटक केलेल्या जितेंद्र परमार, अब्दुलरज्जाक शेख, सरदार पाटील या तिघांची पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना विटा येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तेव्हा त्यांची कसून चौकशी करण्यासाठी पोलिस कोठडी वाढवून मागितली. त्यानुसार न्यायाधीशांनी तिघांना पाच दिवसांची पोलिस कोठडी वाढवली. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे तपास करत आहेत.

पाच किलो माल जप्तसंशयितांनी एमडी ड्रग्जची पहिली बॅच व्यवस्थित न निघाल्यामुळे त्यासाठीचे वापरलेले केमिकल व कच्चा माल औद्योगिक वसाहतीपासून काही अंतरावर टाकून दिला होता. पोलिस तपासात याची माहिती मिळाल्यानंतर जवळपास पाच किलो माल जप्त करण्यात आला आहे.

तपासाकडे लक्षएमडी ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत महिलेसह सात जणांना अटक करण्यात आली आहे. संशयित तिघांची पोलिस कोठडी वाढवल्यामुळे तपासात त्यांच्याकडून आणखी माहिती पुढे येण्याची शक्यता आहे. आणखी काही जणांना अटक केली जाणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे तपासाकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस