राफेल घोटाळाप्रश्नी काँग्रेसचे सांगलीत धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 15:46 IST2018-12-26T15:44:46+5:302018-12-26T15:46:18+5:30
सांगली जिल्हा व सांगली विधानसभा क्षेत्र युवक कांग्रेस च्या वतीने स्टेशन चौक येथे बुधवारी धरणे आंदोलन करण्यात आले.

राफेल घोटाळाप्रश्नी काँग्रेसचे सांगलीत धरणे
सांगली : सांगली जिल्हा व सांगली विधानसभा क्षेत्र युवक कांग्रेसच्यावतीने स्टेशन चौक येथे बुधवारी धरणे आंदोलन करण्यात आले.
काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काँग्रेसने ५२६ कोटी रुपयांमध्ये खरेदी केलेले एक विमान मोदी सरकारने काँग्रेस सरकारने ठरवलेल्या किमतीपेक्षा जास्त किमत देऊन १६०० कोटी रुपयांना का खरेदी केले आहे, राफेल निर्मितीसाठी विमानाची किंमत वाढवून खासगी कंपनीला ३० हजार कोटींचा लाभ देण्यात आला.
या देशातील सरकारी कंपनी हिंदुस्थान एअरोनॉटिकल्सला हे काम द्यायचे होते, परंतु १४ दिवसआधी स्थापन झालेल्या व एका तासाचाही विमान बनविणेचा अनुभव नसलेल्या रिलायन्स कंपनीला विमान निर्मितीचे भाजप सरकार कडून कंत्राट देण्यात आलेकेवळ आपल्या मित्रांना फायदा व्हावा म्हणून देशाच्या सुरक्षेशी खेळ करण्यात आला आहे.
राफेल विमान खरेदीच्या किमतीमध्ये मोठी तफावत असल्याप्रकरनी सरकारकडून याची उत्तरे मिळत नाहीत.संरक्षण मंत्री व पंतप्रधान यांच्याकडून आजतागायत या विषयावर एकही पत्रकार परिषद घेतली गेली नाही. मेक इन इंडियाच्या नावाखाली या देशातील तरुणांना रोजगाराचे गाजर आले आहे.
सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारने राफेल प्रकरणी दाखवण्यात खोटा अहवाल सादर करून क्लीन चिट मिळवली. त्याचा निषेध म्हणून स्टेशन चौकामध्ये क्षेत्र कांग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी मालन मोहिते, वहिदा नायकवडी, अमित पारेकर उपस्थित होते.