साेन्याळच्या तरुणावर बलात्काराचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:28 IST2021-04-08T04:28:22+5:302021-04-08T04:28:22+5:30

माडग्याळ : जत तालुक्यातील एका गावातील २० वर्षीय तरुणीचे आक्षेपार्ह फोटो काढून ते सर्वांना दाखविण्याची तसेच जिवे मारण्याची ...

Rape case against Saenyal youth | साेन्याळच्या तरुणावर बलात्काराचा गुन्हा

साेन्याळच्या तरुणावर बलात्काराचा गुन्हा

माडग्याळ : जत तालुक्यातील एका गावातील २० वर्षीय तरुणीचे आक्षेपार्ह फोटो काढून ते सर्वांना दाखविण्याची तसेच जिवे मारण्याची धमकी देत गेल्या दाेन वर्षांत तिला तालुक्यातील विविध ठिकाणी नेऊन बलात्कार केल्याप्रकरणी साेन्याळ (ता. जत) येथील रेवणसिध्द विठ्ठल बिराजदार याच्याविरोधात उमदी पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उमदी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पीडित तरुणी जत तालुक्यातील एका गावात राहते. तिच्याशी ओळखीचा फायदा घेत संशयित रेवणसिध्द याने तिचे मोबाईलवर आक्षेपार्ह फोटो काढले. ते सर्वांना दाखविण्याची व जिवे मारण्याची धमकी देत त्याने जत तालुक्यात डफळापूर, शेड्याळ, संख तसेच कर्नाटक येथील माजलगाव (ता. इंडी) येथील एका शेतातील वस्तीवर नेऊन वेळाेवेळी बलात्कार केला. गेल्या दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याचे पीडित तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे. उमदी पोलिसांनी संशयित रेवणसिध्द याला अटक केली आहे.

Web Title: Rape case against Saenyal youth