कवठेमहांकाळ तालुक्यात रंगले रक्तचरित्र, हल्लेखोरांचा कुकरीने डोक्यात, छातीवर आणि पोटावर सपासप वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 03:18 PM2021-03-06T15:18:41+5:302021-03-06T15:24:41+5:30

Crimenews Sangli- बोरगाव येथील ग्रामपंचायत सदस्यांच्या खुनापाठोपाठ पिंपळवाडी येथील माजी सरपंच रमेश खोत यांचा भाचा अमर खोत याच्यावर शनिवारी अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला. यामध्ये अमर हा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज सकाळी साडे ९ च्या सुमारास घडली. या घटनेने कवठेमहांकाळ तालुका हादरला आहे. भर चौकात हल्ला झाल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Rangatcharitra in Kavthemahankal taluka, a deadly attack by the attackers | कवठेमहांकाळ तालुक्यात रंगले रक्तचरित्र, हल्लेखोरांचा कुकरीने डोक्यात, छातीवर आणि पोटावर सपासप वार

कवठेमहांकाळ तालुक्यात रंगले रक्तचरित्र, हल्लेखोरांचा कुकरीने डोक्यात, छातीवर आणि पोटावर सपासप वार

googlenewsNext
ठळक मुद्देकवठेमहांकाळ तालुक्यात रंगले रक्तचरित्र, हल्लेखोरांचा कुकरीने डोक्यात, छातीवर आणि पोटावर सपासप वार

कवठेमहांकाळ : बोरगाव येथील ग्रामपंचायत सदस्यांच्या खुनापाठोपाठ पिंपळवाडी येथील माजी सरपंच रमेश खोत यांचा भाचा अमर खोत याच्यावर शनिवारी अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला. यामध्ये अमर हा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज सकाळी साडे ९ च्या सुमारास घडली. या घटनेने कवठेमहांकाळ तालुका हादरला आहे. भर चौकात हल्ला झाल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की अमर खोत हा शहरातील थबडेवाडी सिद्धनाथ भवन हॉटेल मध्ये साडे ९ वाजता बसला होता. यावेळी अज्ञात दोघे दुचाकी वरून आले आणि काही समजायच्या आतच हल्लेखोरांनी अमर खोत याच्यावर कुकरीने सपासप वार केले. त्याच्या डोक्यात, छातीवर आणि पोटावर वार केले. त्यामध्ये अमर खोत हा गंभीर जखमी झाला. तातडीने त्यास उपचारास सांगलीला हलवले असून त्याची प्रुकृती चिंताजनक आहे.

हॉटेल मालक विजय माने आणि बघ्यानी अमर खोतच्या मारेकऱ्यांना हुसकावून लावले. यामध्ये विजय माने हेही जखमी झाले आहेत. कवठेमहांकाळ शहरात तसेच तालुक्यात वातावरण तणावाचे बनले आहे. हे मारेकरी कोण याचा पोलीस शोध घेत आहेत. हा हल्ला पूर्व वैमनश्यातून झाला असल्याची तालुक्यात चर्चा आहे.

हरोलीचे माजी सरपंच युवराज पाटील यांच्या खून प्रकरणी पिंपळवाडीचे माजी सरपंच रमेश खोत हे संशयित असून त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. अमर खोत हा भाचा त्यांचा  आहे.त्यामुळे हा हल्ला पूर्व वैमनश्यातून झाला असल्याची चर्चा आहे.

Web Title: Rangatcharitra in Kavthemahankal taluka, a deadly attack by the attackers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.