रामचंद्र महाजन यांची नगर रचना सह संचालकपदी पदोन्नती, शिराळकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 12:26 IST2023-11-02T12:26:31+5:302023-11-02T12:26:42+5:30
विकास शहा शिराळा: येथील रामचंद्र महाजन यांची अमरावती विभागाचे नगर रचना विभागाचे सह संचालक म्हणून पदोन्नती झाली आहे. महाजन ...

रामचंद्र महाजन यांची नगर रचना सह संचालकपदी पदोन्नती, शिराळकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा
विकास शहा
शिराळा: येथील रामचंद्र महाजन यांची अमरावती विभागाचे नगर रचना विभागाचे सह संचालक म्हणून पदोन्नती झाली आहे. महाजन यांच्या पदोन्नतीमुळे सांगली जिल्ह्यातील शिराळकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम व यवतमाळ हे पाच जिल्हे त्याच्या कार्य क्षेत्रात येतात.
रामचंद्र महाजन यांचे शालेय शिक्षण शिराळा येथे झाले. नंतर त्यांनी शासकीय तंत्रनिकेतन कराड येथून स्थापत्य अभियंताची पदविका उत्तीर्ण केली. ए.एम.आई ही पदवी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स इंडिया कोलकाता येथून मिळवली. सन १९९६ मध्ये नगररचना विभागात सहाय्यक नगररचनाकार या पदावर त्यांची नियुक्ती झाली. २०१६ साली नगरचनाकार वर्ग एक या पदावर पदोन्नती मिळाली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमधून सहाय्यक संचालक नगर रचना या पदावर नियुक्ती झाली. त्यांनी अकोला महानगरपालिका येथे उपसंचालकनगर रचना विकास योजना विशेष घटक या पदावर काम केले आहे.
१९९६ ते २००४ मध्ये कोल्हापूर येथे सहाय्यक नगररचनाकार, भूमी संपादन अधिकारी, पुणे येथे सह जिल्हा निबंधक वर्ग एक, औरंगाबाद महानगरपालिकेत सहाय्यक संचालक नगर रचना म्हणून उत्कृष्ट काम केले होते. आता त्यांच्याकडे सहसंचालक नगर रचना या पदाचाही अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.