शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

साहित्यामुळे निकोप समाजनिर्मितीस बळ: रामचंद्र भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 12:03 AM

आळसंद : साहित्य हे समाजमनाचा आरसा आहे. साहित्यातील ज्वलंत व वास्तव लिखाणाने निकोप समाजाची निर्मिती होत असते. साहित्यातून रंजल्या-गांजलेल्या ...

आळसंद : साहित्य हे समाजमनाचा आरसा आहे. साहित्यातील ज्वलंत व वास्तव लिखाणाने निकोप समाजाची निर्मिती होत असते. साहित्यातून रंजल्या-गांजलेल्या माणसाला न्याय व ऊर्जा देण्याचे काम करावे, असे आवाहन संमेलनाध्यक्ष लेखक रामचंद्र भोसले (सातारा) यांनी केले.बलवडी भा. (ता. खानापूर) येथील ज्योतिर्लिंग साहित्य सेवा मंडळाच्यावतीने २७ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात ते बोलत होते. यावेळी माजी प्राचार्य डॉ. बी. एन. पवार, सामाजिक कार्यकर्ते भाई संपतराव पवार, स्वागताध्यक्ष अ‍ॅड. सतीश लोखंडे, वासंती मेरू आदी उपस्थित होते.रामचंद्र भोसले म्हणाले, आचार व विचार हा माणसाच्या आयुष्याला नवा अर्थ प्राप्त करून देण्याचे काम करतो. नव्या पिढीच्या हाती मोबाईलऐवजी पुस्तक दिले पाहिजे. पुस्तकातून वैज्ञानिक दृष्टिकोन मिळतो. साहित्यातून माणसाला शहाणपण व संयम मिळतो.डॉ. बी. एन. पवार म्हणाले, देशात सध्या दोन प्रवाह प्रचलित आहेत. एक पुरोगामी व दुसरा प्रतिगामी प्रवाह आहे. पुरोगामी विचारांची कास धरण्यासाठी साहित्य हे प्रभावी व उत्तम माध्यम आहे. साहित्यातून पुरोगामी विचारांची निर्मिती होत असते.स्वागताध्यक्ष सतीश लोखंडे यांनी, साहित्यात वेगवेगळे प्रवाह कार्यरत असून त्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. दुभंगलेल्या माणसांची मने जोडणाऱ्या साहित्याची खºयाअर्थाने निर्मिती व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.प्रारंभी माजी प्राचार्य डॉ. बी. एन. पवार यांच्याहस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. ‘लोककला आणि मराठी साहित्य’ या विषयावर प्रा. राजेंद्र पोळ यांनी मनोगत व्यक्त केले. दुसºया सत्रात कवी रमजान मुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन झाले.या कार्यक्रमास मारुती पवार, शिवाजी पवार, बी. डी. कुंभार, कुसुम सावंत, रामचंद्र कास्कर, सु. धों. मोहिते, महादेव दुपटे, बापूराव पवार, डी. एम. सरवदे, छबन तुपे, संजय निकम, दीपक कुलकर्णी, हरिभाऊ पुदाले, प्रा. संतोष जाधव, शहाजी जाधव यांच्यासह साहित्यरसिक उपस्थित होते. जे. डी. पवार यांनी प्रास्ताविक केले. ओंकार जाधव यांनी सूत्रसंचालन केले. जगदीश पवार यांनी आभार मानले.मुल्ला, शिंदे यांचे अभिनंदनसाहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झालेले लेखक सलीम मुल्ला, सुशीलकुमार शिंदे यांच्या अभिनंदनाचा ठराव संमेलनस्थळी करण्यात आला.