शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची भेट; निकालापूर्वी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?
2
मनोज जरांगे पाटलांनी उपोषणाची तारीख बदलली; निर्णयामागील कारणही सांगितलं!
3
फडणवीसांच्या जवळच्या आमदाराने उद्धव ठाकरेंना फोन केला? प्रसाद लाड यांनी सगळंच सांगितलं
4
'मतमोजणीत गडबड आढळल्यास व्हिडिओ पाठवा', काँग्रेसने जारी केला हेल्पलाइन क्रमांक
5
छगन भुजबळ कोणत्या पक्षात? जयंत पाटील म्हणाले,"उद्या निकालानंतर सांगतो...";
6
...तर मी स्वत:ला संपवून घेईन: सोनवणेंचा निवडणूक अधिकाऱ्याला इशारा; पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
7
लोकसभेच्या निकालाआधीच पवारांकडून विधानसभेची तयारी सुरू?; भाजपच्या माजी आमदाराने घेतली भेट
8
देशात इंडिया आघाडीचे सरकार येईल? काँग्रेसचे 'चाणक्य' डीके शिवकुमार यांनी केली ही भविष्यवाणी
9
चोराचा अजब कारनामा; चोरी करायला घरात शिरला अन् AC च्या थंडाव्यात झोपी गेला, सकाळी...
10
"मोदींची ध्यानधारणा हीदेखील 'मूक पत्रकार परिषद'च होती"; संजय राऊतांचा आयोगावर पलटवार
11
कशी होते मतांची मोजणी? EVM-VVPAT स्लिप्सचे काय होते? जाणून घ्या संपूर्ण ABCD...
12
पुलवामामध्ये मोठी चकमक; टॉप कमांडर रियाझ अहमद डारसह आणखी एकाला कंठस्थान
13
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा Exit Poll आला; इंडिया आघाडीला किती जागा मिळणार, पाहा...
14
कार जाऊ द्या, आता बाईकमध्येही आली 'एअरबॅग'; होंडाच्या या दुचाकीचा किंमत किती माहित्येय?
15
भारतात आल्यावर पहिल्यांदा मृणाल दुसानीसने या पदार्थावर मारला ताव
16
मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले तर काहीतरी भव्य दिव्य होणार; 10 हजार पाहुणे, स्थळ अन् तारीखही ठरली...
17
आरोग्यासाठी फायदेशीर असणारं लिंबू पाणी नेमकं कधी प्यावं?; जाणून घ्या, योग्य वेळ
18
शेअर बाजार 'रेकॉर्ड हाय'वर बंद; 'Modi Stocks'नं एकाच दिवसात केलं मालामाल, अदानींचे शेअर्स रॉकेट
19
लोकसभा निकालाआधीच बॉलिवूडमध्ये मोदींचा डंका! 'या' खानने BJP चं केलं अभिनंदन, म्हणाला...
20
लोकसभेच्या निकालाआधीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश

Hatkanangle Lok Sabha Constituency: राजू शेट्टी तहात रुसल्याने निवडणूक चुरशीची

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2024 5:54 PM

तिरंगी व अटीतटीच्या लढतीच्या निकालाची उत्सुकता

अशोक पाटीलइस्लामपूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी आणि महायुतीसोबत तह करण्याचा निर्णय मागे घेतला. तडजोडीत त्यांचा रुसवा कोणीही काढू शकले नाहीत. अखेर महाविकास आघाडीमधून उद्धवसेनेचे उमेदवार सत्यजित पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली. राजू शेट्टी यांच्या स्वतंत्र भूमिकेमुळे ही लढत महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारांमध्ये थेट होण्याऐवजी तिरंगी झाली.लोकसभा निवडणुकीची चाहूल लागण्याअगोदरच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी ‘एकला चलो’ची भूमिका घेतली होती. ऊस दराच्या निमित्ताने उत्पादकांची ताकद पुन्हा एकवटण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी होत असतानाच २०२४ च्या लोकसभेचे बिगुल वाजले. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राजू शेट्टी यांच्यासोबत तह करण्याचे निश्चित केले होते. शेट्टी यांनी महाविकास आघाडी सोबत जाण्याऐवजी केवळ पाठिंब्याची भूमिका घेतली. तसेच, उद्धवसेनेचे मशाल चिन्ह घेऊन निवडणूक लढविण्यास नकार दिला. त्यांची धरसोडीची भूमिका पाहून उद्धव ठाकरे यांनी सत्यजित पाटील यांची उमेदवारी जाहीर केली.

मुख्यमंत्र्यांनी ठोकला तळप्रारंभीच्या टप्प्यात राजू शेट्टी यांची चांगलीच हवा होती. त्यानंतर उद्धवसेनेचे उमेदवार सत्यजित पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली. पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विशेषत: भाजप आणि शिंदेसेनेमध्ये अस्वस्थता पसरली. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच हातकणंगलेत आपले लक्ष्य केंद्रित केले आणि राजकीय हवा पलटली. त्यामुळेच मतदान चुरशीने झाले. तीनही उमेदवार आपणच बाजी मारणार, असा दावा करीत आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीsangli-pcसांगलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Raju Shettyराजू शेट्टीhatkanangle-pcहातकणंगले