शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा पोलीस दलात खाकी वर्दीतील महिलांचे राज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जनतेच्या सुरक्षेसाठी, कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अहोरात्र कार्यरत असणाऱ्या पोलीस दलामध्ये चोवीस तास कार्यरत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : जनतेच्या सुरक्षेसाठी, कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अहोरात्र कार्यरत असणाऱ्या पोलीस दलामध्ये चोवीस तास कार्यरत राहावे लागते. याच पुढच्या क्षणी कोणते आव्हान स्वीकारता येईल याचा अंंदाजही नसलेल्या पोलीस दलात महिलांनी आपल्या कामगिरीने ठसा उमटविला आहे. जिल्हा पोलीस, अपर पोलीस अधीक्षक पदासह इतर सर्व पदांवर आणि जबाबदारीच्या पदावरही या महिला आपली कामगिरी चोखपणे बजावत आहेत.

अपर पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत असलेल्या मनीषा दुबुले यांची जिल्ह्यातील एन्ट्रीच मुळात महापुराच्या कालावधीत झाली. त्यांनीही या कालावधीत नवीन असल्याचा बाऊ न ठेवता झोकून देऊन काम केले. भिलवडी परिसरात त्यांनी मुक्काम करून पूरग्रस्तांना मदत करत कामकाजाची सुरुवात केली. जत येथे वयोवृद्ध महिलेवर झालेल्या अत्याचाराच्या तपासासाठी त्यांनी सलग ११ दिवस त्या परिसरात ठाण मांडून आरोपीला गजाआड केले. त्यांनी सामाजिक बांधीलकीही जपली आहे.

सांगली शहरातील वाहतूक नियाेजनाचे काम करणाऱ्या प्रज्ञा देशमुख यांनीही आव्हान म्हणूनच या विभागाचा पदभार स्वीकारला. पहिल्यांदाच एखादी महिला अधिकारी ट्रॅफिक विभागात दाखल झाली आहे. यापूर्वी त्यांनी महिला सहाय्यता कक्षातूनही प्रभावी काम करत अनेक मोडणारे संसार वाचवले आहेत.

अनैतिक मानवी वाहतूक कक्षाच्या सहायक निरीक्षक मायादेवी काळगावे यांनीही या विभागात अशीच उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

याशिवाय कवठेमहांकाळ येथे कार्यरत दीपाली गायकवाड, विश्रामबाग पोलीस ठाण्यात कार्यरत सुशिीला खाडे यांनीही अशीच वेगळी कामगिरी नोंदविली आहे.

चौकट (फोटो)

पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव महिला ‘डॉग हँडलर’

पोलीस दलातील श्वानपथकात कार्यरत असलेल्या शबाना आत्तार या पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव महिला डॉग हँडलर ठरल्या आहेत. नऊ महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर त्या कार्यरत झाल्या असून सध्या त्या ‘कूपर’ या श्वानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील आव्हानात्मक गुन्ह्यांचा तपास करत आहेत. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अपर अधीक्षक मनीषा दुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली त्या कार्यरत आहेत.